ईशान - अनन्याचं 'ब्रेक अप', तीन वर्षातच वेगळं होण्याचा निर्णय

बॉलीवूडमध्ये अल्पावधीत मोठी लोकप्रियता मिळवलेल्या जोडींमध्ये अभिनेता ईशान खट्टर (ishann khattar) आणि अभिनेत्री अनन्या पांडेचं (ananya pandey) नाव घ्यावे लागेल.
Ishan And Ananya Pandey
Ishan And Ananya Pandeyesakal

bollywood News: बॉलीवूडमध्ये अल्पावधीत मोठी लोकप्रियता मिळवलेल्या जोडींमध्ये अभिनेता ईशान खट्टर (ishann khattar) आणि अभिनेत्री अनन्या पांडेचं (ananya pandey) नाव घ्यावे लागेल. मात्र या दोघांमध्ये काहीच आलबेल नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यात ईशान खट्टर - अनन्यामध्ये ब्रेक अप झाल्याच्या बातमीनं या दोघांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. गेल्या तीन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या अनन्या आणि ईशानच्या या निर्णयानं मात्र चर्चेला (bollywood actress) उधाण आले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या ब्रेक अपच्या बातमीवरुन या दोन्ही सेलिब्रेटींना सोशल मीडियावरुन ट्रोल करण्यात आले होते. अखेर त्यांच्यातील नातं संपुष्टात आल्याचे सुत्रांनी सांगितले आहे.

सध्या सोशल मीडियावर ईशान आणि अनन्याच्या नावाची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु झाली आहे. पिंकविलानं दिलेल्य माहितीनुसार या दोन्ही सेलिब्रेटींमध्ये ब्रेक अप झाले असून ते आता एकमेकांच्या संपर्कात नसल्याचे सांगण्यात येत आहे. करिअरच्या दृष्टीकोनातून त्यांनी हा निर्णय घेतल्याचेही बोलले जात आहे. कारण काहीही असलं तरी अनन्याच्या चाहत्यांना मात्र यामुळे मोठा धक्का बसला आहे. गेल्या तीन वर्षांपासून हे दोघेही एकमेकांना डेट करत होते. त्यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यांच्या व्हिडिओला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसादही मिळाला होता. खाली पिली या चित्रपटातून ते एकत्र आले होते. त्यातून त्यांनी डेटिंगला सुरुवातही केली, काही काळानंतर मात्र त्यांच्या नात्यातील गोडवा संपुष्टात आल्याचे दिसून आले आहे.

Ishan And Ananya Pandey
RRR Review- नावं ठेवायचा विषयच नाही, स्टोरी दणदणीत अभिनय खणखणीत

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या दोघांनी परस्पर संमतीनं एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्यात प्रेम जरी नसलं तरी आम्ही एकमेकांचे चांगले मित्र असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यापूर्वी ईशान आणि अनन्या हे शाहिद कपूरच्या बर्थ डे पार्टीमध्ये दिसले होते. त्यांनी काही दिवसांपूर्वीच हा निर्णय घेतला असून त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. अनन्याचा दोन महिन्यांपूर्वी गहराईया नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यातील तिच्या भूमिकेवरुन तिला नेटकऱ्यांनी ट्रोल केले होते. त्यात दीपिका पदुकोण, सिद्धांत चतुर्वेदी यांच्या प्रमुख भूमिका होत्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com