चित्रपटात काम नसेल तर, बिपाशा अशी करते कोटींची कमाई !

वृत्तसंस्था
गुरुवार, 9 जानेवारी 2020

बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री बिपाशा बासू गेल्या काही दिवसांपासून चित्रपटांपासून दूरावलेली दिसते. पण, मग चित्रपटातून नाही तर कशी करते कमाई जाणून घ्या. 

मुंबई : बॉलिवूडमध्ये टिकून राहणं हे काही सोप्प काम नाही. दिवसेंदिवस या क्षेत्रातील स्पर्धा वाढत आहे. नवनवीन कलाकार सातत्याने येत आहेत. त्यामुळे या क्षेत्रातील जुने कलाकार कधीतरी मागे पडतात. कधीकधी कलाकारांना त्यांच्या आवडीचे रोल करायला मिळत नाहीत आणि त्यामुळेही सिनेमे हातून निघून जातात. बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री बिपाशा बासू गेल्या काही दिवसांपासून चित्रपटांपासून दूरावलेली दिसते. पण, मग चित्रपटातून नाही तर कशी करते कमाई जाणून घ्या. 

नेहा पेंडसेच्या नवऱ्याची दुसरी बायको आहे तिच्यापेक्षा सुंदर, पाहा फोटो !

आपल्या मादक डोळ्यांनी अनेकांच्या हृदयावर राज्य करणारी बिपाशा बासू तिच्या रिअल लाईफमध्ये लाईफ पार्टनर शोधण्यात अपयशी ठरली होती. करणसिंह ग्रोव्हरसोबत तिचं लग्न होऊन जवळपास तीन वर्षे झाली आहेत. पण, तिच्या लग्नाच्या आधीच्या अफेअर्सची चर्चा अजूनही सुरूच असते. ते दोघं सोशल मीडियावर अॅक्टीव असतात आणि दोघांचे एकमेकांसोबतचे फोटो चांगलेच व्हायरलही होतात. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Some days you just have to create your own sunshine  #loveyourself

A post shared by bipashabasusinghgrover (@bipashabasu) on

बिपाशाचा शेवटचा बॉलिवूड चित्रपट ‘अलोन’ होता. 2015 मध्ये या चित्रपटातून ती दिसली आणि मग 2016 मध्ये अभिनेता करण सिंग ग्रोवर सोबत लग्नबंधनात अडकली. खरंतर बिपाशा करणपेक्षा पुढे आहे. लोकप्रियता, अनुभव आणि संपत्ती यामध्ये ती करणपेक्षा कित्येकपटीने पुढे आहे. कमाईमध्येही बिपाशा करणला मात देते आणि चित्रपटात काम न करताही तिची संपत्ती 100 कोटींच्या घरात आहे. 

गेल्या चार वर्षात बिपाशा सिनेमामध्ये झळकली नसली तरी मात्र ती जाहीरातीमधून ती चांगलीच कमाई करते. नॅशनल आणि मल्टीनॅशनल अनेक कंपन्यांच्या जाहीरातींचा ती चेहरा आहे. मोठमोठ्या ब्रॅंडसाठी ती जाहीराती करते. शिवाय स्टेज शोदेखील करते. बिपाशा देखणी आहे. त्याचसोबत ती अतिशय फिट अभिनेत्री आहे. फिटनेस आणि ती ब्युटी आयकॉन असल्य़ाने फॅशन शोमध्येही ती पुढे असते. अनेक मॅगझीन कव्हरचा ती चेहरा आहे. 

Fact check : 'छपाक' मध्ये ऍसिड हल्ला करणाऱ्या आरोपीचा बदलला धर्म ?

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Thank you @rameshtaurani and Varsha ji for a wonderful night #diwalinights #monkeylove

A post shared by bipashabasusinghgrover (@bipashabasu) on

करण आणि बिपाशा  ‘आदत’ चित्रपटातून एकत्र दिसणाऱ असल्याची चर्चा बी-टाऊनमध्ये आहे. त्याची अधिकृत घोषणा झालेली नाही. पण, चाहत्यांना या जोडीला एकत्र बघण्याची उत्सुकता आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bollywood actress bipasha basu income source