अरे याला म्हणतात 'वर्कआऊट'; मंदिराचा व्हिडिओ पाहिल्यास उडेल झोप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अरे याला म्हणतात 'वर्कआऊट'; मंदिराचा व्हिडिओ पाहिल्यास उडेल झोप
अरे याला म्हणतात 'वर्कआऊट'; मंदिराचा व्हिडिओ पाहिल्यास उडेल झोप

अरे याला म्हणतात 'वर्कआऊट'; मंदिराचा व्हिडिओ पाहिल्यास उडेल झोप

मुंबई - वयाची 49 वर्षे पूर्ण करणाऱ्या मंदिराची गोष्टच वेगळी आहे. तिनं आतापर्यत आपल्या वेगळेपणानं चाहत्यांची पसंती मिळवली आहे. तिचं बोलणं, दिसणं आणि फिटनेस या साऱ्या गोष्टी चाहत्यांच्या नेहमीच चर्चेचा विषय असतात. गेल्या काही दिवसांपासून मंदिरा चर्चेत आली आहे. भलेही काही काळापासून मंदिरा चित्रपट क्षेत्रापासून दूर असली तरी अनेक टीव्ही आणि रियॅलिटी शो मधल्या तिच्या हजेरीनं चाहते आनंदून जातात. अशा मंदिराचे वर्कआऊट करतानाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्याला चाहत्यांनी वेगवेगळ्या कमेंटही दिल्या आहे.

49 वर्षांच्या मंदिरा बेदीनं 33 हँडस्टेंड केले आहेत. ते पाहून तिच्या चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. यासोबत त्यांनी तिच्यावर कौतूकाचा वर्षावही केला आहे. फॅन्सनं जेव्हा हा व्हिडिओ पाहिला तेव्हा त्यांना प्रश्न पडला आहे की, मंदिरानं हे कसं केलं असेल? मंदिरानं आपल्या इंस्टावरुन हा व्हिडिओ शेय़र केला असून त्याला आतापर्यत हजारो लाईक्स आणि व्ह्युज मिळाले आहेत. प्रसिद्ध अभिनेता टायगर श्रॉफनं देखील मंदिराचे कौतूक केले आहे. त्यानं त्या व्हिडिओला लाईक केलं आहे. त्या व्हिडिओला शेयर करताना मंदिरानं लिहिलं आहे की, तुम्हा सगळ्यांना हा व्हिडिओ शेयर करुन शुभसकाळच्या शुभेच्छा देते.

काही महिन्यांपूर्वी मंदिरावर दु:खाचा डोंगर कोसळला. तो म्हणजे तिचे पती राज कौशल यांचे निधन झाले. त्यानंतर मंदिराला मोठा मानसिक धक्का बसला. मात्र तिनं पुन्हा सोशल मीडियावर अॅक्टिव्ह होत स्वताला वेगवेगळ्या कामांमध्ये व्यस्त करुन घेतले आहे. सोशल मीडियावर मंदिराचा चाहतावर्ग मोठा आहे. तिचे फॉलोअर्सही मोठ्या प्रमाणात आहे. सध्याच्या घडीला आघाडीची फिटनेस फ्रीक म्हणून मंदिराकडे पाहिले जाते.

हेही वाचा: तिसऱ्या लग्नासाठी आमिर खान तयार; कोण आहे ती अभिनेत्री?

loading image
go to top