अभिनेत्री दीपिकाच्या प्रकृतीत बिघाड, रुग्णालयात दाखल

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या प्रकृतीविषयीची मोठी बातमी समोर आली आहे.
 Bollywood Actress Deepika Padukone
Bollywood Actress Deepika Padukone esakal

Deepika Padukone Hospitalized: बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या प्रकृतीविषयीची मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे (Bollywood Actress) हैद्राबादमध्ये एका चित्रपटाचे शुटिंग करताना दीपिकाची प्रकृती अचानक बिघडली आहे. त्यामुळे तिला एका रुग्णलयात दाखल कऱण्यात (Bollywood News) आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. प्रोजेक्ट के नावाच्या चित्रपटाच्या शुटींगमध्ये दीपिका व्यस्त असल्याचे सांगण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दीपिकाचा रक्तदाब वाढल्यानं तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बॉलीवूडमध्ये सध्याच्या घडीला सर्वोत्तम अभिनेत्री म्हणून दीपिकाच्या नावाचा उल्लेख करावा लागेल. तिच्या काही महिन्यांपूर्वी डुबे नावाचा चित्रपट प्रदर्शित (Entertainment News) झाला होता. त्याच्यावर नेटकऱ्यांनी टीका केली होती. समीक्षक, चित्रपट अभ्यासक यांनी त्या चित्रपटाचे कौतूकही केले होते. (Deepika Padukone) दीपिकानेच या चित्रपटाची निर्मिती केली होती. मात्र त्याला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला नाही. आता दीपिका हैद्राबादमध्ये प्रोजेक्ट के नावाच्या चित्रिकरणात व्यस्त होती. त्या दरम्यान तिला अचानक अस्वस्थता जाणवू लागली. दीपिका ही प्रभाससोबत शुटींग करत होती.

 Bollywood Actress Deepika Padukone
Allu Arjun On Bollywood: पुष्पा म्हणतो,आमची तुलना बॉलीवूडशी होईलच कशी!

दीपिकाला हैद्राबादमधील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आता तिला ती ज्या हॉटेलमध्ये थांबली होती तिथे पुन्हा पाठवण्यात आले आहे. दाक्षिणात्य मनोरंजन विश्वातील घडामोडी देण्यात प्रसिद्ध असणाऱ्या मनोबाला विजयबालन यांनी त्यांच्या ऑफिशियल अकाउंटवरुन दीपिकाविषयीची माहिती दिली होती. त्यात त्यांनी आता दीपिकाची प्रकृती व्यवस्थित असून ती पुन्हा शुटींगच्या ठिकाणी आल्याचे सांगितले आहे.

 Bollywood Actress Deepika Padukone
Ranveer Vs Wild Bear Grylls : 'मला वाचव!' रणवीरनं बेयर ग्रिल्सला जोडले हात

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com