तो आरोप अन् अभिनेत्री दीप्ती नवल डिप्रेशनमध्ये, शेवटी...|Bollywood Actress Dipti Naval Depression happy birthday story | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bollywood Actress Dipti Naval
तो आरोप अन् अभिनेत्री दीप्ती नवल डिप्रेशनमध्ये, शेवटी...

तो आरोप अन् अभिनेत्री दीप्ती नवल डिप्रेशनमध्ये, शेवटी...

Bollywood News: बॉलीवूडमध्ये (Bollywood Actress) आपल्या अभिनयानं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये दीप्ती नवल (Dipti Naval) यांच्या नावाचा उल्लेख करावा लागेल. 70 ते 80 च्या दशकांत दीप्ती नवल यांच्या नावाची वेगळी क्रेझ होती. त्यांचा चाहतावर्गही मोठा होता. सामाजिक भूमिका, लेखिका म्हणूनही त्यांनी वेगळी ओळख निर्माण केल्याचे दिसून आले आहे. आज त्यांचा जन्मदिन आहे. त्यानिमित्तानं आपण त्यांच्याविषयीच्या आठवणींना उजाळा देणार आहोत. अमृतसर मध्ये 3 फेब्रुवारी 1953 मध्ये दीप्ती नवल यांचा जन्म झाला. त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या चित्रपटांमध्ये काम केले. आर्ट मुव्हीमध्ये (Art Movies) देखील दीप्ती नवल यांची भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहिली.

साधारण 80 च्या दशकांत दीप्ती नवल यांना एका वेगळ्या मानसिक त्रासाला सामोरं जावं लागलं होतं. त्यामुळे त्यांना काही काळ बॉलीवूडमधून माघार घ्यावी लागली होती. एक थिएटर आर्टिस्ट (Theater Artist) म्हणून त्यांनी आपल्या करिअरला सुरुवात केली होती. त्यावेळी फारुख शेख आणि दीप्ती नवल यांची जोडी हिट झाली होती. त्यांच्या अनेक चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. दीप्ती नवल यांच्या वडिलांची अशी इच्छा होती की, त्यांनी चित्रकार व्हावं. कारण त्यांना त्यात गती होती. मात्र दीप्ती यांची आवड थिएटरमध्ये असल्यानं त्यांनी चित्रकार होण्यापेक्षा कलाकार व्हावं असं ठरवलं.

1978 मध्ये श्याम बेनेगल दिग्दर्शित जुनून मधून दीप्ती नवल यांनी बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यासाठी त्यांना फिल्मफेअरचा अॅवॉर्डही मिळाला होता. मात्र आजही त्यांची ओळख ही चष्मेबहाद्दुरसाठी आहे. या चित्रपटामध्ये त्यांनी साकारलेली भूमिका ही नेहमीच चाहत्यांचे लक्ष वेधून घेते. त्यामध्ये त्यांनी एका सेल्स गर्लची भूमिका केली होती. दरम्यान दीप्ती यांच्यावर एक गंभीर आरोप करण्यात आला होता. तो म्हणजे त्या सेक्स रॅकेट चालवतात अशाप्रकारच्या आरोपानं त्या डिप्रेशनमध्ये गेल्या होत्या. चष्मेबहाद्दुरच्या वेळेस एका ठिकाणी मुलाखत देत असताना त्यांच्या घरी आलेल्या काही जणांनी हा आरोप केला होता. त्यामुळे त्यांना मोठ्या मानसिक त्रासाला सामोरं जावं लागलं होतं. या कारणामुळे आपल्याला काम मिळणं अवघड झाल्याचे दीप्ती यांनी सांगितले.

हेही वाचा: Video Viral: घटस्फोटानंतर आमीर खान - किरण राव पुन्हा एकत्र?

Web Title: Bollywood Actress Dipti Naval Depression Happy Birthday Story

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..