esakal | 'ड्रामा'पेक्षा 'बिझनेस डील' जास्त महत्वाची, जेनेलियाच्या टिप्स
sakal

बोलून बातमी शोधा

'ड्रामा'पेक्षा 'बिझनेस डील' जास्त महत्वाची, जेनेलियाच्या टिप्स

'ड्रामा'पेक्षा 'बिझनेस डील' जास्त महत्वाची, जेनेलियाच्या टिप्स

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - आपल्या खमक्या अंदाजासाठी जेनेलिया (genelia deshmukh) बॉलीवूडमध्ये (bollywood) ओळखली जाते. अरेला का रे म्हणण्यासाठीही तिची सोशल मीडियावर छबी पाहायला मिळते. आक्रमक आणि बिनधास्त स्वभावाची जेनेलिया ट्रोलर्सला सडेतोड उत्तर देऊन त्यांना गप्प करते. सध्या ती चर्चेत आली आहे ते तिच्या एका फोटोशुटमुळे. तिनं एक फोटोशुट केलं आणि त्याचे फोटो सोशल मीडियावरुन शेयर केले. त्यावरुन तिला ट्रोल करण्यात आले होते. मात्र ज्यांनी तिला ट्रोल केले त्यांना तिनं चांगलंच सुनावलं आहे. तिच्या या परखडपणामुळे चाहत्यांनी तिचं कौतूक केलं आहे. रितेश आणि जेनेलियाच्या वेगवेगळ्या फोटो आणि व्हिडिओंना चाहते नेहमी प्रतिसाद देताना दिसतात. त्यांचे व्हिडिओ चाहत्यांचे लक्ष वेधून घेतात.

प्रख्यात अभिनेता अरबाज खानच्या पिंच सीझनच्या दुसऱ्या पर्वामध्ये रितेश आणि जेनेलिया आले होते. त्यावेळी अरबाजनं जेनेलियाच्या त्या फोटोंना ज्या कमेंट मिळाल्या होत्या त्या त्यांना वाचून दाखवल्या. त्यावर जेनेलियानं आपल्या परखड स्वभावाचा परिचय पुन्हा एकदा करुन दिला आहे. तिच्या त्या उत्तरामुळे उपस्थितांनी तिचं कौतूक केलंय. तिला त्या फोटोंमध्ये काहींनी चीप आणि बेशरम असे म्हटले होते. त्यावर तिनं आपली प्रतिक्रिया दिली होती. आता तिनं जे फोटो शेयर केले आहेत त्यात आपण कशाप्रकारे विचार करायला हवा, व्यक्त होताना काय काळजी घ्यायला हवी हे सांगितलं आहे. ती म्हणते, मी जेव्हा फोटो किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करते आणि मला ट्रोल केलं जातं तेव्हा त्याचा काही फरक मला पडत नाही. मी त्याचा फारसा विचारही करत नाही.

जेनेलियानं आता जे फोटोशुट केले आहे त्या फोटोंना दिलेल्या कॅप्शनमध्ये ती म्हणते, जेव्हा तुम्ही थकून जाता तेव्हा आराम करायला शिकलं पाहिजे, दुसऱ्या एका फोटोमध्ये ती चाहत्यांना सांगते डोळे बंद करा आणि स्वस्थ राहा. आपल्याला ज्या काही गोष्टी मिळाल्या आहेत त्याच्याबद्दल आभार मानायला शिका. तिच्या या टीप्सला चाहत्यांनी लाईक्स करुन प्रतिसाद दिला आहे. मला नेहमी वाटतं आपण कुठल्याही गोष्टींचा ड्रामा न करता त्याला सामोरं जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मला तर बिझनेस डील जास्त महत्वाची वाटते. असं तिनं सांगितलं आहे.

हेही वाचा: 'माझ्या बायकोचे नाव जेनेलिया नाही, तर..'; रितेश देशमुखने सांगितलं खरं नाव

हेही वाचा: 'वहिनी' म्हणताच, जेनेलिया खुदकन हसली

loading image
go to top