
Good Luck Jerry: तरच करेल मी लग्न! काय आहेत जान्हवीच्या अटी?
Janhvi Kapoor in Good Luck Jerry: बॉलीवूडच्या दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी म्हणून जान्हवीची ओळख न राहता तिनं आता आपल्या अभिनयानं वेगळी ओळख निर्माण केली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर (Bollywood Actress Janhvi kapoor) जान्हवीच्या बोल्ड लूकनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिच्या रेड शिमरमधील लूकनं नेटकऱ्यांना वेगवेगळ्या (Bollywood movies news) प्रतिक्रिया देण्यास भाग पाडलं आहे. तिच्या त्या फोटोंवर कमेंट देताना जान्हवीला अनेकांनी लग्न करण्याचा सल्ला दिला आहे. जान्हवीनं देखील अशी कमेंट करणाऱ्यांना जशास तसे उत्तर दिले आहे.
जान्हवीच्या एका पोस्टवर प्रतिक्रिया देताना नेटकऱ्यांनी आता तुला लग्न (entertinement news) करण्याची गरज असल्याचे सांगितले होते. त्यानंतर जान्हवीन त्या लग्नासाठी आपल्या काही खास अटी आहेत. असे सांगून नेटकऱ्यांची उत्सुकता ताणली आहे. जान्हवीच्या मते तिचा होणारा पती कसा असावा हे आपण जाणून घेणार आहोत. जान्हवीला तिच्या होणाऱ्या पतीमध्ये काही खास गोष्टी असाव्यात असे वाटते. ज्यामुळे त्याचे व्यक्तिमत्व माझ्याबरोबर इतरांना देखील प्रभावित करेल.
जान्हवी आपल्या लाईफ पार्टनरविषयी सांगते की, तो जो कुणी असेल त्यानं त्याच्या कामात निष्णात असायला हवं. त्याच्या कामाप्रती त्याची इच्छाशक्ती तीव्र हवी. त्यामुळे त्याचे व्यक्तिमत्व आणखी झळाळून निघेल. मला असा व्यक्ती आवडेल जो त्याच्या जॉबप्रती पूर्णपणे समर्पित आहे. जान्हवी ही सध्या तिच्या गुड लक या चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. हा चित्रपट 29 जुलैला ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. त्याच्या प्रमोशनमध्ये ती सध्या व्यस्त आहे.
हेही वाचा: जान्हवीच्या अदा अन लाखो फिदा! रेखाच्या 'ईन आखो की मस्ती'वर नाचतेय जान्हवी
मला माझा होणार पती किंवा बॉयफ्रेंड हा बॉलीवूडमधला असावा असे अजिबात वाटत नाही. पण तो कुणी असेल त्याच्यात काही खास गुण असावेत एवढं मात्र नक्की वाटते. माझ्या पार्टनरकडे सेन्स ऑफ ह्युमर असावा. त्याच्याकडून मला काही गोष्टी शिकता याव्यात. हे जास्त महत्वाचे आहे. जान्हवीचा येत्या काळात जो गुड लक नावाचा जो चित्रपट प्रदर्शित होणार आहे तो एक क्राईम थ्रिलर मुव्ही आहे.
हेही वाचा: जॉन अब्राहम म्हणाला,'चित्रपट करुन मला पैसा कमवायचा नाही तर...'
Web Title: Bollywood Actress Janhavi Kapoor Good Luck Jerry Movie Qualities In Husband
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..