कंगनाचं बेताल वक्तव्य; शीख बांधव भडकले, 'तिला जेलमध्ये टाका नाहीतर' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कंगनाचं बेताल वक्तव्य; शीख बांधव भडकले, 'तिला जेलमध्ये टाका नाहीतर'
कंगनाचं बेताल वक्तव्य; शीख बांधव भडकले, 'तिला जेलमध्ये टाका नाहीतर'

कंगनाचं बेताल वक्तव्य; शीख बांधव भडकले, 'तिला जेलमध्ये टाका नाहीतर'

मुंबई - बॉलीवूडची अभिनेत्री कंगना रनौतनं शेतकरी आंदोलनकर्त्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळे ती चर्चेत आली आहे. त्याची सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. गेल्या काही दिवसांपासून कंगनानं बेताल वक्तव्यांची मालिकाच सुरु केली आहे. त्यामुळे तिच्यावर राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातून वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसत आहे. आताही तिनं खलिस्तानी आतंकवाद्यांमुळे कृषी विधेयक मागे घेतल्याचे धक्कायक विधान करुन नव्या चर्चेला तोंड फोडले आहे. त्यामुळे तिच्यावर दिल्लीतील शीख गुरुव्दारा प्रबंध कमिटीनं पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली आहे.

यासगळ्यात शिरोमणि अकाली दलाचे नेते आणि दिल्लीतील शीख गुरुव्दारा प्रबंध कमिटीचे अध्यक्ष मनजिंदर सिंह यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी कंगनाला खडसावलं आहे. ते म्हणाल, कंगनाचे वक्तव्य चूकीचे आहे. तिला आता पहिलं तुरुंगात टाका नाहीतर वेड्यांच्या इस्पितळात तरी दाखल करा. कंगनाचं ते वक्तव्य तिची चीप मेंटलिटी दर्शवते. त्यामुळे तिच्यावर कारवाई झाली पाहिजे. तिच्या वक्तव्यामुळे समाजात दुही पसरण्याची भीती आहे. सिरसा यांनी सांगितलं की, खलिस्तानी यांच्यामुळे कृषी विधेयक मागे घेतले गेले. या विधानाला काहीच अर्थ नाही. कंगणानं हे विधान का केलं हे वेगळं सांगण्याची गरज नाही. ती केवळ तरुणाईची माथी भडकावण्याचे काम करते. यासगळ्यात तिला मिळणारा राजकीय सपोर्ट यामुळे तिच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही.

काय लिहिलं होतं कंगनानं?

कंगनानं आपल्या इंस्टावरुन एक स्टोरी शेयर केली होती. त्यामध्ये तिनं म्हटलं होतं की, खलिस्तानी आतंकवाद्यांनी भलेही सरकारला वेठीस धरलं असेल मात्र त्यांनी एक गोष्ट विसरता कामा नये ती म्हणजे त्यांना एका महिला पंतप्रधानांनी किती जेरीस आणलं होतं. त्यावेळी त्या सगळ्यांना पुरुन उरल्या होत्या. त्यावेळी देशाच्या प्रश्नावरुन कुणीही कितीही गदारोळ केला असेल मात्र त्यांनी सर्वांना नामोहरम केले होते. एखाद्या मच्छरासारखे सर्वांना रगडले होते. मात्र देशाचे तुकडे त्यांनी होऊ दिले नाहीत. अशा आशयाची प्रतिक्रिया कंगनानं दिली होती. त्यामुळे तिच्यावर सडकून टीका करण्य़ात आली आहे. सोशल मीडियावरुनही तिच्यावर अनेकांनी चिखलफेक केली आहे.

हेही वाचा: तिसऱ्या लग्नासाठी आमिर खान तयार; कोण आहे ती अभिनेत्री?

हेही वाचा: कंगना रनौतवर गुन्हा दाखल; शीख समुदायाचा अपमान करणं महागात पडणार

loading image
go to top