कृषी कायदे रद्द : कंगना म्हणते,'आता हुकुमशाही हा एकमेव पर्याय' | Kangana Ranaut | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कृषी कायदे रद्द : कंगना म्हणते,'आता हुकुमशाही हा एकमेव पर्याय'
कृषी कायदा रद्द करण्यावर कंगना संतापली, 'आता यावर एकच उपाय तो म्हणजे'...

कृषी कायदे रद्द : कंगना म्हणते,'आता हुकुमशाही हा एकमेव पर्याय'

आपल्या वादग्रस्त वक्तव्य़ासाठी कंगना नेहमीच चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून ती त्यामुळे चर्चेत आली आहे. त्यामुळे तिला मोठ्या प्रमाणावर टीकेलाही सामोरं जावं लागलं आहे. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातून तिच्यावर टीका करण्यात आली आहे. तिनं देशाला मिळालेलं स्वातंत्र्य हे भीक असल्याचे म्हटले होते. विशेष म्हणजे त्याला प्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले यांनी पाठींबा देखील दिला होता. यामुळे त्यांना देखील ट्रोल करण्यात आले आहे. आता ज्या जाचक अटींमुळे शेतकऱ्यांनी कृषी कायद्याला विरोध केला होता तो अखेर रद्द करण्यात आला आहे. त्यावर अभिनेत्री कंगनानं प्रतिक्रिया दिली आहे. (Kangana Ranaut on Farm law repeal)

अभिनेत्री कंगनानं कृषी कायदा रद्द झाल्यानंतर जी प्रतिक्रिया दिली आहे त्यातून तिचा संताप दिसून येतो आहे. तिनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदा रद्द केल्यानंतर नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे आपण निराश झाल्याचे म्हटले आहे. यावर तिनं सोशल मीडियावरुन एक पोस्ट देखील शेयर केली आहे. त्यामध्ये आपल्याला कृषी कायदा रद्द केल्यानं वाईट वाटल्याचे तिनं सांगितलं आहे. दु;खदायक, क्लेशकारक आणि लज्जास्पद तसेच सर्वार्थानं चूकीचा असा निर्णय घेतल्याचे कंगनानं म्हटलं आहे. जर आता लोकं रस्त्यावर येवून कायदा तयार करु लागले तर काय बोलायचे. म्हणजे ज्या सरकारला आपण निवडून दिले आहे ते जो कायदा तयार करतात त्याचा मान न ठेवता रस्त्यावर उतरुन कायदा तयार केला जात आहे अशा जिहादी देशाचं कौतूक करायला हवं. असं तिनं म्हटलं आहे.

कंगनानं आपल्या दुसऱ्या एका पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, तिनं यावेळी देशाच्या दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा फोटो शेयर केला आहे. त्यावर तिनं कॅप्शन लिहिलं आहे की, जेव्हा देश एखाद्या गंभीर संकटात असतो, तो गाढ झोपेत असतो तेव्हा त्याला जागं करण्यासाठी एखाद्या हुकूमशाहीचीच गरज असते. देश चालविण्यासाठी सर्वोत्तम पर्याय म्हणजे हुकूमशाही. असं तिनं लिहिलं आहे. यावेळी तिनं इंदिरा गांधींच्या आठवणींना उजाळाही दिला आहे. आज इंदिरा गांधी यांची 104 वी जयंती आहे. शुक्रवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदा रद्द केल्याची घोषणा केली.

हेही वाचा: Movie Review; 'जय भीम' सणसणीत 'चपराक'

हेही वाचा: 'यापुढे विक्रम गोखलेंसोबत काम करणार नाही'; निर्मात्याची घोषणा

loading image
go to top