'ते वक्तव्य मुस्लिम व्यक्तीनं केलं असतं तर'.... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'ते वक्तव्य मुस्लिम व्यक्तीनं केलं असतं तर'....
'ते वक्तव्य मुस्लिम व्यक्तीनं केलं असतं तर'....

'ते वक्तव्य मुस्लिम व्यक्तीनं केलं असतं तर'....

sakal_logo
By
टीम इ सकाळ

मुंबई - वादग्रस्त हा शब्द आता कंगनाला समानअर्थी झाला आहे. ती नेहमीच तिच्या वादासाठी चर्चेत असते. दरवेळी वेगवेगळ्या प्रकारच्या वादांमध्ये ती अडकल्याचे दिसुन आले आहे. आताही गेल्या काही दिवसांपूर्वी तिनं पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतर तिनं एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. त्यामध्ये तिनं देशाच्या स्वातंत्र्यावरुन धक्कादायक वक्तव्य केलं होतं. त्यामुळे ती चर्चेत आली. कंगनानं आपल्या देशाला मिळालेलं स्वातंत्र्य हे भीक मागून मिळालं. असं म्हटलं. त्यामुळे तिच्यावर गुन्हा दाखल करावा यासाठी काही राजकीय पक्षांनी आंदोलनंही केल्याचे दिसून आले आहे.

देशाला जे स्वातंत्र्य मिळालं ते 2014 मध्ये. याशिवाय महात्मा गांधी हे भगतसिंग यांच्या मृत्युला जबाबदार असल्याचे तिनं सांगितल्यानं कंगनावर नाराजी व्यक्त करण्यात आली होती. काल मराठीतील ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी तर कंगनाच्या वक्तव्याला जाहीर पाठींबा दिल्यानं त्यांनाही नेटकऱ्य़ांनी ट्रोल केल्याचे दिसून आले आहे. कंगना जे बोलली ते बरोबर आहे. मी त्याचे समर्थन करतो. अशी प्रतिक्रिया गोखले यांनी दिली होती. त्यामुळे कंगना आणखी चर्चेत आली आहे. आता प्रसिद्ध अभिनेत्यानं तिच्याविरोधात चक्क देशाच्या गृहमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. खरं तर त्या अभिनेत्यासोबत कंगनाचे अनेकदा वादही झाले आहेत. ते एकमेकांचे कट्टर विरोधक असल्याचे त्यांच्या चाहत्यांना माहिती आहे.

हेही वाचा: 'शिवसेना भाजप एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही'; विक्रम गोखले

प्रसिद्ध अभिनेता केआरके अर्थात कमाल राशिद खान हा त्याच्या वादग्रस्त वक्तव्यासाठी ओळखले जाते. त्यानं आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर लिहिले आहे की, जर कुणी एका मुस्लिम व्यक्तीनं देशातील स्वातंत्र्य सेनानींचा अपमान केला असता तर त्याला देशद्रोही समजले असते. आणि त्याला जेलमध्येही टाकले जाते. तर मग कंगनान केलेल्या एका विधानामुळे तिला अटक का केली जात नाही. मी आता जे व्टिट केले आहे त्यावरुन देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मी कंगनाच्या अटकेची मागणी केली आहे. याशिवाय युपी पोलिसांना देखील ते व्टिट टॅग केले आहे.

हेही वाचा: विक्रम गोखलेंच्या वक्तव्यावर शरद पवार यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

हेही वाचा: 'कंगना जे म्हणाली ते खरंय, मी समर्थन करतो'; विक्रम गोखले

loading image
go to top