अभिनेता विजयनं वाचले करिनाचे व्हॉटस ॲप मेसेज, त्यात तर...

बॉलीवूडची बेबो करिना कपूर आणि अभिनेता विजय वर्मा याशिवाय जयदीप अहलावत हे लवकरच एका प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे.
Kareena Kapoor-Khan
Kareena Kapoor-KhanGoogle

Kareena Kapoor: बॉलीवूडची बेबो करिना कपूर आणि अभिनेता विजय वर्मा याशिवाय जयदीप अहलावत हे लवकरच एका प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. (Bollywood News) नेटफ्लिक्सच्या वतीनं त्याची निर्मिती करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासन करिनाच्या या चित्रपटाची चर्चा आहे. मात्र सध्या सोशल मीडियावर करिना आणि विजयच्या एका गंमतीशीर मेसेजची चर्चा आहे. झाले असे (Viral News) की, करिना तिच्या व्हाट्सवरुन कुणाशी बोलत असताना ते मेसेज विजयनं वाचले. ते काय होते हे त्यानं सोशल मीडियावर व्हायरल केले. करिना आणि विजयमधील चर्चाही त्यात दिसून आली आहे. नेटकऱ्यांनी या मेसेजला तितक्याच गंमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

करिना जेव्हा तिच्या मोबाईलमधून चॅटिंग करत होती तेव्हा तिनं विजय आपल्या मोबाईलमधील मेसेज पाहतो आहे हे नोटीस केले होते. सोशल मीडियावर तिनं (Social media News) त्याबाबत खुलाला केला आहे. ती म्हणते विजय तू माझे मेसेज चोरुन वाचण्याचा प्रयत्न तर करत नाहीस ना? यासगळ्या प्रकरणात (entertainment news) अभिनेता अर्जुन कपूरनं देखील सहभाग घेतला आहे. त्यानं देखील करिनाची टिंगल करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र करिनानं त्याला जशास तसे उत्तर दिले आहे. तिनं त्याला जास्त बोलू न देता विजयला मात्र झालेल्या प्रकारावरुन जाब विचारला आहे. नेटफ्लिक्सच्यावतीनं आगामी काळात जो करिनाचा चित्रपट येणार आहे त्याच्या शुटिंगमध्ये ती बिझी आहे. हा चित्रपट The Devotion of Suspect X वर आधारित आहे. त्यात विजय वर्मा हा करिनाचा सहाय्यक अभिनेता आहे.

Kareena Kapoor-Khan
IIFA 2022: पंकज त्रिपाठीच्या मुलीपुढे बॉलीवूडच्या तारका फिक्या!

विजय आणि करिना त्या चित्रपटाच्या शुटींगसाठी दार्जिलिंगमध्ये असल्याचे सांगण्यात आले आहे. करिनानं तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन एक फोटो शेयर केला आहे. त्यामध्ये विजय तू माझ्या मोबाईलमधील मेसेजेस वाचण्याचा प्रयत्न केला आहेस का...असा प्रश्न करिनानं विचारला होता. त्यावर अर्जुननं मध्येच त्या पोस्टवर कमेंट करत करिनाला म्हटलं आहे की, आता त्याला खूप काही कळलं असेल...त्यावर करिनानं लगेच अर्जुनला, मला तुझा फोन पाहायचा आहे. असे म्हणून एक इमोजी शेयर केला आहे. अभिनेत्रीच्या या पोस्टला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

Kareena Kapoor-Khan
IIFA 2022:विकी कौशलनं पुन्हा केलं लग्न?; वरातीचा मजेदार व्हिडीओ व्हायरल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com