IIFA 2022: पंकज त्रिपाठीच्या मुलीपुढे बॉलीवूडच्या तारका फिक्या!

अल्पावधीतच आपल्या अभिनयानं बॉलीवूडमध्ये स्वताची वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता म्हणून अभिनेता पंकज त्रिपाठीचे नाव (bollywood news) घ्यावे लागेल.
IIFA 2022 Pankaj Tripathi Daughter aashi Tripathi
IIFA 2022 Pankaj Tripathi Daughter aashi Tripathi esakal

IIFA Awards 2022: अल्पावधीतच आपल्या अभिनयानं बॉलीवूडमध्ये स्वताची वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता म्हणून अभिनेता पंकज त्रिपाठीचे नाव (bollywood news) nघ्यावे लागेल. अनुराग कश्यपच्या गँग्स ऑफ वासेपूरमधून त्यानं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्या केले होते. त्यानंतर मात्र पंकज त्रिपाठी लाईमलाईटमध्ये आला. त्याच्याकडे वेगवेगळ्या मालिका येऊ लागल्या. त्यातील एक प्रसिद्ध सीरिज म्हणजे मिर्झापूर. आतापर्यत दोन सीझन या मालिकेचे आले (social media) आहेत. तिसऱ्या सीझनची तयारी सुरु आहे. सध्या पंकज हा आयफा 2022 मध्ये त्याच्या कुटूंबासमवेत आला होता. त्यावेळी त्याच्या मुलीचे आशीचे व्हायरल झालेले फोटो नेटकऱ्यांना भावले आहेत. त्यांनी बॉलीवूडच्या अभिनेत्रींना लाजवेल असा लूक आशीचा असल्याच्या कमेंट्स त्या फोटोवर दिल्या आहेत.

काही दिवसांपासून आयफा 2022 पुरस्कार सोहळा विशेष चर्चेत आला आहे. त्याचे (IIFA 2022 Awards) कारणही खास आहे. त्यामध्ये सलमानचं होस्टिंग, वेगवेगळ्या सेलिब्रेटींनी केलेला परफॉर्मन्स, शेरशहा चित्रपटावर झालेल्या (Pankaj Tripathi) पुरस्काराचा वर्षाव यामुळे आयफा चर्चेत राहिला. त्यामध्ये पंकज त्रिपाठीच्या मुलाची आशीचा लूकही नेटकऱ्यांच्या कौतुकाचा विषय होता. पंकज (Bollywood Actors) आणि मुदृला यांचे लग्न 2004 साली झाले. त्यांना आशी नावाची मुलगी आहे. पंकज जेव्हा त्याच्या कुटूंबासमवेत दुबईला गेला होता. त्यावेळी त्याच्या मुलीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्या सोहळ्यात आशीनं रॉयल ब्ल्यु रंगाचा गाऊन परिधान केला होता. तिच्या साधेपणानं सोहळ्यातील वेगवेगळ्या मान्यवरांचे लक्ष वेधून घेतले होते.

IIFA 2022 Pankaj Tripathi Daughter aashi Tripathi
IIFA Viral: बच्चन परिवाराचा डान्स चर्चेत, नेटकऱ्यांकडून वाहवा

पंकजची पत्नी ब्लॅक रंगाच्यासाडीमध्ये होती. नेटकऱ्यांना आशी आणि तिची आई मृदुला यांची जोडी भलतीच आवडली. त्यांनी त्यांच्या फोटोंवर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका युझर्सनं कमेंट केली आहे की, मला तर माहितीच नव्हतं की पंकज त्रिपाठी यांना एवढी सुंदर मुलगी आहे म्हणून... गेल्या काही वर्षांपासुन बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयानं साऱ्याचं लक्ष वेधून घेणारा अभिनेता म्हणून अभिनेता पंकज त्रिपाठीचे नाव घेता येईल. त्यानं अल्पावधीत नेटकऱ्यांना आपलेसे करत त्यांना जिंकून घेतले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com