'लग्नाला यायचं पण'; विकी-कॅटरिनानं नातेवाईकांनाच घातल्या अटी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'लग्नाला यायचं पण'; विकी-कॅटरिनानं नातेवाईकांनाच घातल्या अटी
'लग्नाला यायचं पण'; विकी-कॅटरिनानं नातेवाईकांनाच घातल्या अटी

'लग्नाला यायचं पण'; विकी-कॅटरिनानं नातेवाईकांनाच घातल्या अटी

मुंबई - बॉलीवूडच्या चाहत्यांसाठी खूशखबर म्हणजे प्रख्यात अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफचं लग्न ठरलं आहे. त्यांच्या लग्नाची तारीख आता जवळ येत चालली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांच्या लग्नाविषयी वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा पसरण्यास सुरुवात झाली होती. अखेर त्यावर या दोन्ही सेलिब्रेटींनी त्याविषयी प्रतिक्रिया देऊन त्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. राजस्थानातील एका बड्या हॉटेलमध्ये ते विवाहबद्ध होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. असं असलं तरीही अजून दोघांपैकी कुणीही त्यांच्या सोशल मीडियावरील अकाउंटमधून कोणतीही माहिती शेयर केलेली नाही. त्याचे कारण प्रायव्हसी. अनेकदा सेलिब्रेटी आपली प्रायव्हसी ब्रेक होऊ नये यासाठी ही काळजी घेत असल्याचे दिसुन आले आहे.

आता विकी कौशल आणि कतरिनानं लग्नासाठी चक्क नातेवाईकांनाच काही अटी घातल्याची माहिती समोर आली आहे. हे सगळं प्रायव्हसी जपण्यासाठी केले जात असल्याचे सांगण्यात आले आहे. दोन्ही सेलिब्रेटींची पी आर टीम त्या दोघांच्या लग्नाविषयी कोणत्याही प्रकारची माहिती व्हायरल होणार नाही याची काळजी घेताना दिसत आहे. त्यामुळे विकी आणि कतरिनानं देखील नातेवाईकांना काही गोष्टी कटाक्षानं पाळण्याची सुचना केली आहे. काय आहेत त्या अटी हे आपण पाहणार आहोत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लग्नामध्ये पाहूण्यांची जास्त गर्दी होणार नाही यासाठी त्यांनी विशेष काळजी घेतली आहे. खास निमंत्रितांनाच लग्नात उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. नातेवाईकांना समारंभामध्ये मोबाईल फोन बंद ठेवण्यास सांगण्यात आले आहे. कुठलेही फोटो व्हायरल होणार नाही याची काळजी घेण्यात आले आहे. अर्थात काही ठिकाणी ते त्यांचा मोबाईल वापरु शकणार आहेत.

हेही वाचा: 'दबंग गर्ल' होणार 'खान कुटूंबियांची' सून?

हेही वाचा: Movie Review; प्रेक्षकांच्या भावनेचा बाजार मांडणाऱ्या चॅनेलचा 'धमाका'

मुख्य लग्नसोहळ्यामध्ये फोटो तात्काळ सोशल मीडियावर व्हायरल होणार नाहीत याची काळजी विकी आणि कतरिना घेणार आहे. कुणालाही फोटो सोशल मीडियावर व्हायरल करता येणार नाहीत. अशी अट विकी- कतरिनाच्या टीमकडून घालण्यात आली आहे. यापूर्वी निक आणि प्रियंकाच्या लग्नाच्यावेळी देखील अशाप्रकारच्या अटी घालण्यात आल्या होत्या. असं सांगितलं जात आहे की, येत्या 7 ते 9 डिसेंबर दरम्यान राजस्थानातील एका हॉटेलमध्ये ते दोघे विवाहबद्ध होणार आहेत.

loading image
go to top