'तिचं लग्न झालं तर तू का जळते'?; दीपिका ट्रोल

साऱ्या बॉलीवूडचं लक्ष वेधून घेणारा लग्न सोहळा काल राजस्थानातील एका मोठ्या महालामध्ये पार पडला.
'तिचं लग्न झालं तर तू का जळते'?; दीपिका ट्रोल

मुंबई - साऱ्या बॉलीवूडचं लक्ष वेधून घेणारा लग्न सोहळा काल राजस्थानातील एका मोठ्या महालामध्ये पार पडला. त्याला वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. प्रसिद्ध अभिनेता विकी कौशल आणि कतरिनाच्या लग्नाची चर्चा संपूर्ण देशात आहे. सुरुवातीला त्याचे कोणतेही फोटो अथवा व्हिडिओ व्हायरल होणार नाही याची काळजी घेण्यात आली होती. मात्र अखेर नवरदेव विकीनं सुरुवातीला ते फोटो त्याच्या इंस्टावरुन व्हायरल केले आणि चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. काही मिनिटांतच त्याला लाखो लाईक्स आणि प्रतिक्रिया मिळाल्या.

यावेळी बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी कतरिना आणि विकीला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामध्ये अनुष्का शर्मा, नेहा धुपिया, कंगना रनौत यांचा समावेश आहे. आता त्यामध्ये प्रख्यात अभिनेत्री दीपिकाचंही नाव घ्यावं लागेल. तिच्या प्रतिक्रियेनं साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. यापूर्वी अभिनेत्री कंगनानं देखील विकी आणि कतरिनाला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या दोन्ही दाम्पत्यांचे कौतूक केले आहे. त्यांना भावी जीवनासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत. दीपिकानं दिलेल्या शुभेच्छा काही नेटकऱ्यांना खटकल्या आहेत. त्यामुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे.

त्याचे झाले असे की, दीपिकानं काही दिवसांपूर्वी तिचे बरेचसे फोटो इंस्टावरुन हाईड केले होते. मात्र जेव्हा कतरिना आणि विकीचं लग्न झालं तेव्हापासून ते फोटो पुन्हा दिसायला लागले आहेत. त्यामुळे नेटकऱ्यांनी दीपिकाला ट्रोल करण्य़ास सुरुवात केले आहे. तिचं लग्न झालं तर तु का जळतेस....अशा आशयाच्या काही प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर वाचायला मिळत आहे. यामागील दुसरं कारण असं सांगितलं जात आहे की, दीपिका आणि कतरिना या दोघेही रणबीर कपूरच्या एक्स गर्लफ्रेंड होत्या.

'तिचं लग्न झालं तर तू का जळते'?; दीपिका ट्रोल
Photo | विकी-कॅटच्या लग्नातील खास क्षण
'तिचं लग्न झालं तर तू का जळते'?; दीपिका ट्रोल
'बरं झालं, किमान आता..'; अनुष्काकडून विकी-कतरिनाला हटके शुभेच्छा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com