'तिला नावं ठेवता पण ती'...; अभिनेत्री मनिषाला कुणाचा उमाळा? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'तिला नावं ठेवता पण ती'...; अभिनेत्री मनिषाला कुणाचा उमाळा?
'तिला नावं ठेवता पण ती'...; अभिनेत्री मनिषाला कुणाचा उमाळा?

'तिला नावं ठेवता पण ती'...; अभिनेत्री मनिषाला कुणाचा उमाळा?

sakal_logo
By
टीम इ सकाळ

मुंबई - आपल्या वेगळ्या प्रकारच्या अभिनयानं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये मनिषा कोईरालाचा समावेश होतो. तिनं बॉलीवूमध्ये काही काळ राज्य केलं असं म्हणता येईल. तिच्या नावाचा दबदबाही होता. मात्र त्यानंतर तिला आलेलं आजारपण, तिच्या वैयक्तिक आयुष्यातील संघर्ष यामुळे ती बॉलीवूडपासून लांब गेली. याचा परिणाम तिच्या करिअरवरही झाला. सध्या तिनं बॉलीवूडची सतत चर्चेत असणारी अभिनेत्री कंगनावर एक कमेंट केली आहे. ज्यामुळे चाहत्यांनी आपल्या आवडत्या अभिनेत्रीचं म्हणणं जाणून घेतलं आहे.

एका मुलाखतीमध्ये मनिषानं सांगितलं की, आताची चित्रपट क्षेत्रातली जी पिढी आहे ती बुद्धिमान आहे. हुशार आहे. त्यांना आपण ज्या माध्यमामध्ये काम करतो त्याचे भान आहे. सध्याच्या घडीला आवडणारे कलाकार म्हणून तिनं कार्तिक आर्यन आणि रणबीर कपूर यांची नावं सांगितली. मला आलिया भट्टही खूप आवडते. तिचा काम कऱण्याचा अंदाज भावला. मी केलेल्या कामापेक्षा तिचं काम बरच पुढचं आहे. अशी प्रतिक्रिया मनिषानं यावेळी दिली. मला असं वाटतं की, सध्याच्या घडीला कंगना ही एक प्रभावी अभिनेत्री आहे. मी तिचा क्वीन ज्यावेळी पाहिला तेव्हा तिच्या प्रेमातच पडले.

लोकं कंगनाबाबत काहीही बोलतात पण माझ्या दृष्टीनं ती एक बुद्धीमान अभिनेत्री आहे. तिला अभिनयाची चांगली समजही आहे. त्यामुळे तिला नावं ठेवणं काही योग्य होणार नाही. आपल्याला सध्याच्या घडीला बॉलीवूडमधील सर्वाधिक टँलेंट असणारी अभिनेत्री म्हणून तिचं नाव सांगता येईल. त्यामुळे जे कोणी तिला नावं ठेवतात त्यांनी तिच्याबद्दल आपलं मत बदलण्याची गरज असल्याचेही मनिषानं सांगितलं आहे. मनिषा कोईराला आतापर्यत बॉलीवूडमधील वेगवेगळ्या अभिनेत्यांसोबत काम केले आहे.

हेही वाचा: 'पवार आणि फडणवीसांचं लग्न झालं अन्'... ओवैसींचा संताप

loading image
go to top