खासदार नुसरत जहॉ म्हणते 'प्रेम करणं खरचं असतं अवघड'

अभिनेत्री आणि तृणमुल कॉग्रेसची खासदार नुसरत जहॉ (Nusrat Jahan) ही तिच्या अभिनयाबरोबरच वेगवेगळ्या कारणांसाठी जास्त लोकप्रिय आहे.
Nusrat Jahan
Nusrat Jahan

मुंबई - अभिनेत्री आणि तृणमुल कॉग्रेसची खासदार नुसरत जहॉ (Nusrat Jahan) ही तिच्या अभिनयाबरोबरच वेगवेगळ्या कारणांसाठी जास्त लोकप्रिय आहे. तिचा चाहतावर्गही मोठा आहे. त्यामुळे तिला सोशल मीडियावर फॉलो करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. आता ती चर्चेत आली आहे ते तिच्या दुसऱ्या रिलेशनशिपवरुन. गेल्या काही दिवसांपूर्वी नुसरत जहॉला तिच्या प्रेग्नंसीवरुन नेटकऱ्यांनी ट्रोल केले होते. त्यामुळे त्याला वैतागलेल्या नुसरतनं नेटकऱ्यांना संयम बाळगण्याचे आवाहन केले होते. आता तिनं तिच्या दुसऱ्या बॉयफ्रेंडसोबत एक फोटोशुट केलं आहे. ते पोस्ट केल्यावर त्यावर दिलेल्या कॅप्शनची चर्चा सुरु झाली आहे.

नुसरतनं अभिनेता यश दासगुप्ता (Yash Dasgupta) सोबत काही फोटो शेयर केले आहेत. यावेळी तिनं आपल्या रिलेशनशिपची कबूली दिली आहे. हे फोटो पाहून तिच्यावर चाहत्यांनी कौतूकाचा वर्षाव केला आहे. तिला तिच्या भावी जीवनासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत. नुसरतनं तिच्या रेडिओ शो मध्ये आपल्या रिलेशनशिपचा खुलासा केला आहे. यावेळी यश हा नुसरतच्या इश्क विथ (Ishq with Nusrat) नुसरतमध्ये सहभागी झाला होता. त्याचं होस्टिंग नुसरत करते. बराच काळ नुसरतनं आपल्या दुसऱ्या रिलेशनशिपवरुन चर्चेत आली होती. त्यामुळे तिला नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं होतं. काही दिवसांपूर्वी तिचा निखिल जैनसोबत घटस्फोट झाला होता.

Nusrat Jahan
रणवीरचा '83' बॉक्स ऑफिसवर क्लीन बोल्ड

निखिल जैन आणि नुसरतमधील वादानं अनेकांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यांचे वाद सोशल मीडियावर नेटकऱ्यांसाठी चर्चेचा विषय होता. त्यावरुन नुसरतला ट्रोल करण्यात आले होते. यावेळी तिला कमेंट करताना नेटकऱ्यांनी सभ्यतेची पातळी ओलांडल्याचे दिसून आले होते. त्यानंतर नुसरत ही यश दासगुप्ता आणि आपल्या मुलावरुन चर्चेत आली होती.

Nusrat Jahan
Movie Review: नादखुळा 'पुष्पा'!, कडक समंथा, भडक अल्लु अर्जुन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com