esakal | 'यापेक्षा मोठा सन्मान कुठला?: चक्क! अल पचीनोंसोबत पाहिला मुव्ही
sakal

बोलून बातमी शोधा

'यापेक्षा मोठा सन्मान कुठला?: चक्क! अल पचीनोंसोबत पाहिला मुव्ही

'यापेक्षा मोठा सन्मान कुठला?: चक्क! अल पचीनोंसोबत पाहिला मुव्ही

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - हॉलीवूडमध्ये असे काही अभिनेते आहेत ज्यांच्या जगभर चाहतावर्ग पसरलेला आहे. त्यापैकी काही नावं सांगायची झाल्यास रॉबर्ट डी निरो, क्लाइंट इस्टवूड, अल पचीनो, टॉम हँक्स, हे ते अभिनेते आहेत. ही यादी आणखी वाढवताही येईल. मात्र यातील रॉबर्ट डी निरो आणि अल पचीनो यांच्या लोकप्रियतेची गोष्ट वेगळीच आहे. चित्रपट अभ्यासक, समीक्षक, प्रेक्षक, अभिनय शिकणारे विद्यार्थी अशा अनेकांना एकदा तरी या अभिनेत्यांना भेटण्याची इच्छा असते. मात्र प्रत्येकाची इच्छा पूर्ण होतेच असं नाही. बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री पूजा बत्राची (Pooja Batra) ती इच्छा पूर्ण झाली आहे.

पूजानं सोशल मीडियावरून एक फोटोशेयर केला आहे. त्यात ती महान अभिनेता अल पचीनो (Al Pacino) यांच्यासोबत असल्याचे दिसते आहे. ती त्यांच्यासोबत चित्रपट पाहण्यासाठी गेल्याचं तिनं सांगितलं आहे. आपल्या अनोख्या शैलीसाठी अल पचिनो प्रसिद्ध आहे. त्यांनी गॉडफादरमध्ये साकारलेला डॉन आजही प्रेक्षकांच्या मनात आहे. वेगवेगळ्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिकेनं त्यांना लोकप्रियतेच्या शिखरावर नेलं. वेगवेगळ्या पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आलं आहे. अशा या अभिनेत्याला भेटणं आणि त्यांच्या समवेत चित्रपट पाहणं हा मोठा आनंद होता. अशी प्रतिक्रिया पूजानं दिली आहे.

पूजाही बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिनं काही चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. मात्र तिच्या वाट्याला आतापर्यत दुय्यम भूमिका आल्या आहेत. तिनं सहकारी अभिनेत्री म्हणून काही भूमिका साकारल्या आहेत. विरासतमध्ये तिनं अनिल कपूरच्या मैत्रीणीची भूमिका वठवली होती. ती प्रेक्षकांच्या पसंतीस पडली होती. अल पचिनो यांच्या एका मुव्हीच्या स्क्रिनिंमध्ये पूजा गेली होती. त्यावेळी तिनं अल पचिनो यांच्यासोबत काही फोटो काढले. आणि आता ते शेयर केले आहेत.पूजानं आपल्या त्या फोटोंना एक कॅप्शनही दिली आहे. तिनं लिहिलं आहे की, लिजंड अभिनेता अल पचीनो त्यांच्यासोबत फोटो काढणं यासारखा दुसरा सन्मान कुठला. ही माझ्यासाठी खरच आनंदाची बाब आहे. पूजाच्या त्या पोस्टला सर्वप्रथम तिच्या पतीनं नवाब शाहनं कमेंट केली आहे.

हेही वाचा: सलमान आणि आयुषचं ‘अंतिम- द फाइनल ट्रुथ’: पोस्टर व्हायरल

हेही वाचा: रितेश-जेनेलियाचा 'टिप टिप बरसा पानी' डान्स व्हायरल

loading image
go to top