esakal | रितेश-जेनेलियाचा 'टिप टिप बरसा पानी' डान्स व्हायरल
sakal

बोलून बातमी शोधा

रितेश-जेनेलियाचा 'टिप टिप बरसा पानी' डान्स व्हायरल

रितेश-जेनेलियाचा 'टिप टिप बरसा पानी' डान्स व्हायरल

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असणारं कपल म्हणून अभिनेता रितेश देशमुख (ritiesh deshmukh) आणि जेनेलियाला (genelia dsouza) ओळखलं जातं. आपल्या वेगवेगळ्या फोटो, व्हिडिओनं त्यांनी चाहत्यांची मोठ्या प्रमाणावर पसंती मिळवली आहे. त्या दोघांचाही फॅन फॉलोअर्स मोठा आहे. काही दिवसांपूर्वी जेनेलिया आणि रितेशचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यालाही चाहत्यांनी मोठा प्रतिसाद दिला होता. त्यांना गंमतीशीर प्रतिक्रिया देत त्यांचा उत्साह वाढवला होता. आताही त्यांचा एक डान्सचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये त्यांनी आपल्या मित्रांसमवेत रविनाच्या टिप टिप बरसा पानी....या गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. नेहमीप्रमाणे त्यालाही चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट दिल्या आहेत.

येत्या काळात रितेश देशमुख आणि अभिनेता फरदीन खान यांचा विस्फोट नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याशिवाय आणखी काही मोठ्या प्रोजेक्टवर रितेशचे काम सुरु आहे. गणेशोत्सवाच्या काळात रितेशनं लाडक्या गणरायासोबतच्या काही आठवणींना फोटोमध्ये कैद केलं होतं. आणि ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले होते. आपल्या हटक्या स्टाईलसाठी रितेश- जेनेलियाची जोडी बॉलीवूडमध्ये लोकप्रिय झाली आहे. जेनेलिया भलेही बॉलीवूडमध्ये फारशी अॅक्टिव्ह नसली तरी सोशल मीडियावर तिनं चाहत्यांची मोठी पसंती मिळवली आहे. तिच्या फोटो आणि व्हिडिओवरुन ते दिसून आले आहे.

जेनेलियानं आपल्या इंस्टावरुन एक व्हिडिओ शेयर केला आहे. त्यात ती रितेशसह आपले जवळचे मित्र शबीर अहलुवालिया आणि त्याची पत्नी कांची कौल यांच्यासमवेत दिसते आहे. त्यांनी एका झऱ्यात मनसोक्त डुंबण्यांचा आनंद घेतला आहे. ते प्रसिद्ध हिंदी चित्रपटातील गाण्यावर थिरकतानाही दिसत आहे. त्या व्हिडिओला शेयर करताना जेनेलियानं कॅप्शन दिली आहे. त्यात ती म्हणते, टिप टिप बरसा पानी.....भन्नाट...त्या व्हिडिओला चाहत्यांच्या वेगवेगळ्या कमेंट मिळाल्या आहेत.

हेही वाचा: 'माझ्या बायकोचे नाव जेनेलिया नाही, तर..'; रितेश देशमुखने सांगितलं खरं नाव

हेही वाचा: 'दोघांत तिसरा'; रितेश जेनेलियाच्या व्हिडीओतील ती खास व्यक्ती कोण?

loading image
go to top