राणीचं बॉलीवूडच्या 'या' दोन अभिनेत्यांवर होतं 'क्रश' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rani mukherjee
राणीचं बॉलीवूडच्या 'या' दोन अभिनेत्यांवर होतं 'क्रश'

राणीचं बॉलीवूडच्या 'या' दोन अभिनेत्यांवर होतं 'क्रश'

मुंबई- बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयानं वेगळे स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणून राणी मुखर्जीचं नाव घेतलं जातं. चाहत्यांचा मोठा प्रतिसाद तिच्या अभिनयाला मिळाला. साचेबध्द अभिनय सोडून वेगळ्या धाटणीच्या अभिनयातून तिनं चाहत्यांची पसंती मिळवली. तिचा अय्या, ब्लॅक, मर्दानी, मर्दानी 2 या चित्रपटांना प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. बॉलीवूडमध्ये आघाडीची अभिनेत्री म्हणूनही राणीचं नाव नेहमीच घेतलं जातं. राणी बॉलीवूडमध्ये आघाडीची अभिनेत्री म्हणून कार्यरत होती तेव्हा तिचं नाव बॉलीवूडमधल्या काही अभिनेत्यांसोबत घेतलं गेलं. तिच्या त्या रिलेशनची चर्चाही झाली. मात्र राणीचं त्या बॉलीवूड अभिनेत्यांसोबतचं क्रश तेव्हा फार चर्चेत आलं होतं.

त्याचं काय आहे राणी मुखर्जी ही तिच्या बंटी आणि बबली 2 मध्ये दिसणार आहे. तिच्या समवेत प्रमुख भूमिकेत सैफ अली खान दिसणार आहे. सध्या राणी त्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी व्यस्त आहे. त्यासाठी प्रसिद्ध टीव्ही शो कपिलच्या कॉमेडी शो मध्ये सहभागी झाली होती. त्यामध्ये तिनं आपण तेव्हा ज्या बॉलीवूडच्या अभिनेत्यांच्या प्रेमात होतो त्यांची नावं सांगितलं. त्यांच्याविषयीच्या काही आठवणींना उजाळा दिला. तेव्हा उपस्थित प्रेक्षकांना धक्का बसला. राणीनं बिनधास्तपणे तिच्या अंदाजात त्याविषयी सांगितलं. कपिलनं त्याच्या शैलीत गंमतीशीर प्रश्न विचारुन तिला बोलतं केलं. त्या शो चा प्रोमोही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

राणीनं सांगितलं की, आपण काही काळ किंग खान शाहरुख आणि मिस्टर परफेक्शनिस्ट आमीरच्या प्रेमात होतो. ते आपले क्रश होते. असं तिनं सांगितलं. वास्तविक राणी आणि अभिषेक बच्चन यांच्या रिलेशनशिपची बराच काळ बॉलीवूडमध्ये चर्चा होती. ते लग्नही करणार होते. मात्र त्या लग्नाला जया बच्चन यांनी विरोध केला होता. असेही सांगितले गेले. त्यामुळे ते लग्न काही होऊ शकले नाही. आपण ज्यावेळी शाहरुख आणि आमीरसोबत रोमँटिक सीन केला तेव्हा आपल्याला वेगळं जाणवलं. त्यातून त्यांच्याविषयी क्रश तयार झाल्याचं राणीनं सांगितलं. राणीनं शाहरुख सोबत कुछ कुछ होता है नावाचा मुव्ही केला होता. तर आमीरसोबत गुलाम नावाचा चित्रपट केला होता. आपण जेव्हा आमिरचा कयामत से कयामत तक पाहिला तेव्हा त्याच्या प्रेमातच पडल्याची आठवण राणीनं यावेळई सांगितली.

हेही वाचा: Movie Review; 'जय भीम' सणसणीत 'चपराक'

हेही वाचा: Movie Review; जीव गमावलेली कथा 'हम दो हमारे दो', निव्वळ पांचट...

loading image
go to top