esakal | रविनाचं घर आहे की,'राणीची बाग',फोटो पाहिलेत?
sakal

बोलून बातमी शोधा

raveena tondon news

रविनाचं घर आहे की,'राणीची बाग',फोटो पाहिलेत?

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडचे सेलिब्रेटी (bollywood celebrity) चर्चेत राहण्यासाठी काय करतील, याचा काय भरवसा नाही. रविना टंडन (raveena tondon) अशा सेलिब्रेटींपैकी आहे जी नेहमी चर्चेत असते. ती सोशल मीडियावरही अॅक्टिव्ह असणारी अभिनेत्री आहे. वेगवेगळ्या रियॅलिटी शो मध्येही ती परिक्षकाच्या भूमिकेत असल्याचे दिसून आले आहे. वयाची 40 ओलांडली तरी तिच्या सौंदर्यात काही फरक पडला नसून फोटो पोस्टमधून ती चाहत्यांना भेटत असते. त्यांच्याशी संवाद साधत असते. आता ती चर्चेत आली आहे त्याचे कारण म्हणजे तिचं घर आणि त्या घरातील प्राणी संग्रहालय...(bollywood actress raveena tandon three owls one monkey one bat and birds photo viral)

गेल्या काही दिवसांपूर्वी रविनाचा (raveena farm house) आपल्या फार्म हाऊममध्ये काम करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्याला तिच्या चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. त्यात ती आपल्या फार्म हाऊसवर काम करत असल्याचे दिसून आले होते. रविनाचे डान्सचे व्हिडिओ तिच्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असतात. सध्या तिच्या घरात काही पक्षी आणि प्राणी आले आहेत. त्याचा व्हिडिओ तिनं शेयर केला आहे. त्यामध्ये एक माकड, एक घुबड आणि एका वटवाघळाचा समावेश आहे. रविनाला प्राण्यांबद्दल जिव्हाळा आहे. ती एक पर्यावरणप्रेमी असल्याचे यापूर्वी दिसून आले आहे. त्यासाठी ती वेगवेगळ्या प्रकारच्या उपक्रमांमध्येही सहभागी होत असते.

रविनानं जो व्हिडिओ पोस्ट केला आहे त्यात तिच्या घरात किती पाळीव प्राणी आहेत याचा अंदाज आपल्याला येतो. रविनानं त्याचे काही फोटोही शेयर केले आहेत. मागील काही दिवसांत तिनं आपल्या लाडक्या मांजराचा फोटो शेयर केला होता. तर दुसऱ्या हातात घुबडाचे एक पिल्लुही होते. याशिवाय तिच्या घरात वटवाघुळ, कुत्रा, ससा हेही आहेत. त्यांच्या सहवासात रविनाला आनंद वाटतो. ती त्यांच्या समवेत बराच वेळ व्यतीत करत असल्याचे दिसून आले आहे.

आताच्या फोटोला तिनं कॅप्शन दिलं आहे की, नीलाया मध्ये या मित्रांच्या सहवासात राहणं मला आवडतं. पाळीव प्राण्यांच्या पिल्लांना वाचवणं ही एक सर्वसामान्य बाब आहे. माझं घर हे डॉ.डूलिट्लच्या घरासारखे झाले आहे. त्यात 3 घुबड, एक माकड, एक वटवाघुळ, काही कबुतरे, पोपट, मांजरीची पिल्लंही आहेत. यासगळ्यांना सांभाळणं मोठा आनंद असल्याची भावना रविनानं व्यक्त केली आहे.

हेही वाचा: 'ही पोरी कोणाची?'; मराठी कपलचा सुपरहिट डान्स व्हिडीओ व्हायरल

हेही वाचा: ऑनलाइन शॉपिंगमध्ये शाहिदच्या पत्नीची फसवणूक

यातल्या काही प्राण्यांवर औषधोपचार करुन मी त्यांना त्यांच्या मुळ अधिवासात सोडले आहे. त्याची चिंता करण्याचे काही कारण नाही. त्यांची योग्य ती काळजी घेतली आहे. या कामी मला मदत करणाऱ्यांचेही मी आभारी आहे. त्यांच्याशिवाय हे काही शक्य नव्हते. या शब्दांत रविनानं आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

loading image