स्पायडर मॅनला शिल्पाची डान्स शिकवणी; त्यानंतर केली अजब मागणी

आपल्या हटके अंदाज आणि वक्तव्यामुळे बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) नेहमीच चर्चेत असते.
स्पायडर मॅनला शिल्पाची डान्स शिकवणी; त्यानंतर केली अजब मागणी

मुंबई - आपल्या हटके अंदाज आणि वक्तव्यामुळे बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) नेहमीच चर्चेत असते. आपला पती राज कुंद्रामुळे (Raj kundra) ती काही काळ वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. तिच्या पतीवर अश्लील व्हिडिओ तयार करणे आणि ते शेयर करणे याप्रकरणी त्याला मुंबई पोलिसांनी अटक केली होती. आता सध्या तो जामीनावर बाहेर आहे. काल सर्वोच्च न्यायालयानं त्याला दिलासा दिला आहे. दुसरीकडे शिल्पाचा सोशल मीडियावर याप्रकरणाच्या चर्चेपासून दूर जाण्याचा प्रयत्न केला आहे. काल स्पायडर मॅनचा (Spider Man No Way Home) चित्रपट प्रदर्शित झाला. त्याची सगळीकडे चर्चा आहे.

यासगळ्यात शिल्पा शेट्टीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यामध्ये तिनं चक्क स्पाय़डर मॅनला (Spider Man) काही डान्सच्या स्टेप्स शिकवल्या आहेत. त्याला चाहत्यांचा मोठा प्रतिसादही मिळाला आहे. स्पायडर मॅनच्या चाहत्यांना त्याच्यावर बेतलेल्या चित्रपटाची मोठ्या प्रमाणात उत्सुकता होती. गेल्या काही दिवसांपासून स्पायडर मॅनची चर्चा होती. प्रेक्षकांनी आपल्या आवडत्या स्पायडर मॅनचा चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये गर्दी केली आहे. दरम्यान शिल्पानं तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन एक व्हिडिओ शेयर केला आहे. तिनं आपल्याला या चित्रपटाचं तिकीट हवं आहे अशी मागणी स्पायडर मॅनकडे केली आहे. तिच्या या गंमतीदार व्हिडिओला नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

स्पायडर मॅनला शिल्पाची डान्स शिकवणी; त्यानंतर केली अजब मागणी
शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा
स्पायडर मॅनला शिल्पाची डान्स शिकवणी; त्यानंतर केली अजब मागणी
शिल्पा शेट्टीमुळे 'इंडियाज गॉट टॅलेंट'च्या सेटवर पुन्हा रंगला वाद...

शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty Video) ही नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणारी सेलिब्रेटी आहे. यावेळी तिनं जो व्हिडिओ शेयर केला आहे त्यामध्ये तिनं आपल्याला स्पायडर मॅनचे तिकिट हवं आहे आणि ते मिळत नसल्याची तक्रार केली आहे. जसं ती आपल्या घरात फिरते तसं तिनं चक्क स्पायडर मॅनकडे आपल्याला त्याच्या चित्रपटाचं तिकिट हवं. अशी मागणी केली आहे. एवढ्यावरचं हा व्हिडिओ संपत नाही तर यावर शिल्पानं त्याला काही डान्स स्टेप्सदेखील शिकवल्या आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीड़ियावर चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

स्पायडर मॅनला शिल्पाची डान्स शिकवणी; त्यानंतर केली अजब मागणी
शिल्पानं हेअर स्टाईलिस्टला दिली कानाखाली 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com