सोनाक्षी हाजिर हो!, 25 एप्रिलपर्यत कोर्टात हजर होण्याचे आदेश|Bollywood Actress Sonakshi Sinha | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sonakshi sinha

सोनाक्षी हाजिर हो!, 25 एप्रिलपर्यत कोर्टात हजर होण्याचे आदेश

Bollywood News: अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. तिच्यावर मुराबाद कोर्टानं अटक वॉरंट काढला आहे. तिला (Bollywood Actress) येत्या 25 एप्रिलपर्यत कोर्टामध्ये हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. यावेळी जर ती हजर न झाल्यास कडक (Bollywood Celebrity) कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे सोनाक्षीची डोकेदुखी वाढली आहे. सोनाक्षी आणि तिचा एक सहकारी यांच्यावर विश्वासघात केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणावर येत्या 25 एप्रिलला सुनावणी होणार असून त्यावेळी सोनाक्षीला उपस्थित राहावे लागणार आहे.

सोनाक्षीसह अभिषेक सिन्हा (Abhishek Sinha) आणि आणखी पाच जणांवर फसवणूक आणि विश्वासघात केल्याचा आरोप करण्यात आला होता. हे प्रकरण चार वर्षे जुने आहे. कटघर येथील रहिवाशी प्रमोद शर्मा यांनी याबाबत तक्रार केली आहे. अभिनेत्रीच्या अटकेला स्थगिती मिळाल्याचे सांगण्यात आले असले तरी तिला कोर्टामध्ये हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. शनिवारी झालेल्या सुनावणीमध्ये न्यायाधीशांनी अभिनेत्रीसह इतरांना हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. सरकारी वकिलांनी सांगितलं आहे की, सोनाक्षी आणि तिच्या सहकलाकांना कोर्टामध्ये हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. सरकारी वकिलांनी सांगितलं की, अटकेपासून संरक्षण मिळावे म्हणून त्यांनी उच्च न्यायालयाकडून स्टे आणला आहे.

हेही वाचा: Photo Viral: दिया मिर्झा पहिल्यांदाच दिसली छोट्या 'अव्यान' सोबत

सोनाक्षीविरोधातील हे प्रकरण चार वर्ष जुनं आहे. एक इव्हेंटमधील कार्यक्रमात न आल्याबद्दल मुरादाबादमधील प्रमोद शर्मा यांना मोठ्या नुकसानाला सामोरं जावं लागलं होतं. 30 सप्टेंबर 2018 मध्ये हा इव्हेंट होणार होता. त्यानंतर 22 फेब्रुवारी 2019 मध्ये त्याबाबत सोनाक्षी सिन्हा, कंपनी अधिकारी अभिषेक सिन्हा, धुर्मिल ठक्कर, मालविका यांच्याविरोधात तक्रार दाखल कऱण्यात आली होती.

हेही वाचा: Pavankhind Movie Video Viral : चिन्मय मांडलेकर यांचा सिनेमागृहातील व्हिडिओ व्हायरल | Sakal Media

Web Title: Bollywood Actress Sonakshi Sinha Warrant 25 April Present Order Social Media

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..