'तुझ्यापेक्षा माझं घरकाम करणारी दिसायला चांगली' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'तुझ्यापेक्षा माझं घरकाम करणारी दिसायला चांगली'
'तुझ्यापेक्षा माझं घरकाम करणारी दिसायला चांगली'

'तुझ्यापेक्षा माझं घरकाम करणारी दिसायला चांगली'

मुंबई - बॉलीवूड अभिनेत्री स्वरा भास्कर ही तिच्या वेगळेपणासाठी प्रसिद्ध असणारी सेलिब्रेटी आहे. ती कायम असणारी अभिनेत्री असून आपल्या वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे स्वरा नेहमीच चर्चेत राहिली आहे. बॉलीवूडमधील इतर सेलिब्रेटींची बाजू घेणही तिला महागात पडलं आहे. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, क्षेत्रातील घडामोंडीवरही तिनं वादग्रस्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. यापूर्वी अभिनेत्री करिना कपूरची बाजू घेणं तिला महागात पडलं होतं. त्यामुळे स्वराला ट्रोल व्हावे लागले होते. आताही स्वरा मोठ्या प्रमाणावर ट्रोल झाली आहे. तिला नेटकऱ्यांनी अतिशय खालच्या पातळीवर जात टीका केली आहे.

आपल्यावर टीका करणाऱ्या व्यक्तींना जशास तसे उत्तर देणारी सेलिब्रेटी म्हणूनही स्वराला ओळखले जाते. ती आपल्या वादग्रस्त स्वभावासाठी प्रसिद्ध आहे. अरे रे का रे करण्यात ती नेहमी आघाडीवर असते. बऱ्याचदा स्वराच वेगवेगळ्या वादांमध्ये अडकून पडल्याचे दिसून आले आहे. आताही एका फोटोमुळे ती वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. त्याचे झाले असे की, स्वरानं तिच्या सोशल मीडियाच्या अकाउंटवरुन एक फोटो शेयर केला. त्यात तिला तिच्या लूकवरुन ट्रोल करण्यात आले आहे. त्या फोटोंवरुन युझर्सनं ज्या कमेंट केल्या त्याला स्वरानं देखील प्रत्युत्तर दिलं आहे. त्यामुळे त्या दोघांमधील कलगीतुरा रंगला आहे. त्याला इतर नेटकऱ्यांचाही मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला आहे.

स्वरा भास्करनं जे व्टिट केलं त्यामध्ये तिनं शेयर केलेल्या फोटोंमध्ये साडी घातली आहे. त्या फोटोला स्वरानं कॅप्शन दिलं होतं. ते असं होतं की, एक साडी, एक पार्क, एक सैर आणि एक पुस्तक.....शांती....असं ते कॅप्शन होतं. त्या फोटोला नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे. त्या फोटोंवरुन एका नेटकऱ्यानं मला तुझा फोटो पाहून असं वाटलं की, माझ्या घरात घरकाम करणारी तुझ्यापेक्षा चांगली दिसते....ती तुझ्यापेक्षा दिसायला सुंदर आहे....स्वरावर अशाप्रकारची प्रतिक्रिया त्या नेटकऱ्यानं दिली आहे. सध्या ती मोठ्या प्रमाणात व्हाय़रल झाली आहे. स्वरानं देखील त्या युझर्सला उत्तर दिलं आहे. तिनं लिहिलं आहे की, मला माहिती आहे की, तुझ्या घरात काम करणारी महिला सुंदर आहे. मला आशा आहे की, तुम्ही तिच्या कष्टाचा आणि स्वाभिमानाचा सन्मान कराल.

हेही वाचा: Movie Review; 'जय भीम' सणसणीत 'चपराक'

हेही वाचा: Movie Review; जीव गमावलेली कथा 'हम दो हमारे दो', निव्वळ पांचट...

loading image
go to top