esakal | बापरे..! उर्वशीने 'या' चित्रपटासाठी घेतले तब्बल 'इतके' कोटी रुपये...
sakal

बोलून बातमी शोधा

urvashi rautelaa.

चित्रपटाची एकूणच कथा तिला कमालीची आवडली आहे म्हणूनच तिने हा चित्रपट स्वीकारला आहे. पण या चित्रपटासाठी तिने भरभक्कम रक्कम घेतली आहे. चित्रपटातील अन्य कलाकारांपेक्षा सर्वाधिक रक्कम तिने घेतली आहे.

बापरे..! उर्वशीने 'या' चित्रपटासाठी घेतले तब्बल 'इतके' कोटी रुपये...

sakal_logo
By
संतोष भिंगार्डे

मुंबई : 'हेटस्टोरी 4', 'सनम रे', 'पागलपंती' अशा काही चित्रपटांमध्ये आपल्या भूमिकेने सर्वांचीच मने जिंकणारी अभिनेत्री उर्वशी रौतेला सध्या सोशल मीडियावर आपले फोटोज् आणि व्हिडीओ शेअर करीत असते. सतत चर्चेत राहणारी ही अभिनेत्री आता पुन्हा मोठ्या चर्चेत आली आहे आणि त्याला कारण आहे 'व्हर्जिन भानुप्रिया' हा चित्रपट. 

मुंबईने करून दाखवलं; दररोज केवळ 'इतक्याच' बेडची आवश्यकता...

'व्हर्जिन भानुप्रिया' या चित्रपटात काही बोल्ड दृश्ये आहेत आणि ती उर्वशी करणार आहे. चित्रपटाची एकूणच कथा तिला कमालीची आवडली आहे म्हणूनच तिने हा चित्रपट स्वीकारला आहे. पण या चित्रपटासाठी तिने भरभक्कम रक्कम घेतली आहे. चित्रपटातील अन्य कलाकारांपेक्षा सर्वाधिक रक्कम तिने घेतली आहे आणि हा आकडा ऐकल्यानंतर तुम्ही अचंबित व्हाल. तिने या चित्रपटासाठी सात कोटी रुपये घेतले आहेत.

मराठी चित्रपटसृष्टी येतेय हळूहळू पूर्वपदावर; टिझर लॉंचिंगसह चित्रीकरणाला सुरुवात...​

चित्रपटातील बोल्ड दृश्ये, वेगळे कथानक, सत्यकथा यासाठी सोशल मिडीयावर 'व्हर्जिन भानुप्रिया'ची चर्चा आधीच रंगली आहे. उर्वशीबरोबर या चित्रपटात अर्चना पुरणसिंग, डेलनाझ इराणी, गौतम गुलाटी, राजीव गुप्ता, निक्की अनेजा, ब्रिजेंद्र कला, रुमान मोला यांचा समावेश आहे. 'व्हर्जिन भानुप्रिया' हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार असल्याचे समजते आहे. 
---
संपादन : ऋषिराज तायडे