esakal | कशी झोकात चालली 'विद्या'; इंडियन नव्हे वेस्टर्न लूक व्हायरल
sakal

बोलून बातमी शोधा

vidya balan

विद्या फक्त ट्रॅडिशनल ड्रेस किंवा साडीच घालते असे अनेकांना वाटते. याबाबत विद्याने नुकताच एक व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर केला आहे.

कशी झोकात चालली 'विद्या'; इंडियन नव्हे वेस्टर्न लूक व्हायरल

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई - हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री म्हणजे विद्या बालन. विद्याचे अनेक चित्रपट हिट ठरले आहेत. विद्या अनेकदा तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे ट्रोल होते. विद्या फक्त ट्रॅडिशनल ड्रेस किंवा साडीच घालते असे अनेकांना वाटते. याबाबत विद्याने नुकताच एक व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर केला आहे. या व्हिडीमधून तिने ट्रॅडिशनल लूकबाबत ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. 

ट्रॅडिशनल आणि मॉडर्न लूकमधील ट्रान्सफर्मेशनचा व्हिडीओ विद्याने सोशल मिडीयावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये विद्याने सुरवातीला ट्रेडिशनल लुक केलेला दिसत आहे आणि नंतर ती अचानक वेस्टर्न लूकमध्ये दिसते. या व्हिडीओला विद्याने कॅप्शन दिले, 'जेव्हा लोक म्हणातात मी फक्त भारतीय कपडे परिधान करते..लगेच पहा.'

विद्याने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये  आधी ती एका सोनेरी रंगाच्या अनारकली ड्रेसमध्ये दिसतेय. अनारकली ड्रेसमध्ये वॉक करत एक टिचकी वाजवते आणि लगेचंच ग्लॅमरस रुपात अदाकारी दाखवताना ती दिसतेय. विद्या बालन हिरव्या बोल्ड गाऊनमध्ये खूप ग्लॅमरस दिसत आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडीओला पसंती दिली आहे.

हे वाचा - 'गाडीवाला आला कचरा टाका'; परिणीती झाली ट्रोल

कहानी, भूल भूलैय्या, हे बेबी, किस्मत कनेक्शन, तुम्हारी सुलू, डर्टी पिच्चर,लगे रहो मुन्ना भाई, मिशन मंगल  या चित्रपटांमधून विद्यानं जबरदस्त अशा भूमिका साकारल्या आहेत. विद्याने हम पांच या मालिकेमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. विद्या बालन लवकरच शेरनी या सिनेमातून झळकणार आहे. मध्य प्रदेशमध्ये या सिनेमाचं शूटिंग सुरू आहे. अमित मासुरकर या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत.

loading image