'या' अभिनेत्रीचे इंस्टाग्राम अकाऊंट झाले हॅक; ट्विटरवरूनच दिली तिने माहिती

सकाळ न्यूज नेटवर्क
Thursday, 28 May 2020

कलाकारांचे पर्सनल लाईफ जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता असते. त्यामुळे कलाकारांचे सोशल मीडिया अकाऊंट हॅक केल्याचे प्रकार कानावर येतात.

मुंबई : कलाकारांचे पर्सनल लाईफ जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता असते. त्यामुळे कलाकारांचे सोशल मीडिया अकाऊंट हॅक केल्याचे प्रकार कानावर येतात. सध्या कलाकारांचे फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम सारखी सोशल मीडिया अकाउंट्स हॅक झाल्याच्या बऱ्याच बातम्या येत असतात. बॉलिवूडमधील अनेक नावाजलेले प्रसिद्ध कलाकारांचे अकाऊंट हॅक झाले आहेत. आता असेच काहीसे बॉलिवूड अभिनेत्री पूजा हेगडेसोबत देखील घडले आहे. पूजाचे इंस्टाग्राम अकाऊंट हॅक झाले आहे. याची माहिती तिने स्वतः तिच्या ट्विटर अकाऊंटवर ट्विट करत दिली आहे. 

मोठी बातमी ः विद्या बालनने पेलली दुहेरी जबाबदारी; एक अभिनेत्री म्हणून तर दुसरी..?

पूजा तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर नेहमीच अॅक्टिव्ह असते. लॉकडाऊन दरम्यान तिने तिचे बरेचसे फोटो आणि व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. अशातच तिचे इंस्टाग्राम अकाऊंट हॅक करण्यात आले झाले. तिने ट्विट करत म्हंटले आहे की, 'मित्रांनो, मला माझ्या टीमकडून सांगण्यात आले आहे की माझं इंस्टाग्राम अकाऊंट हॅक झालं आहे आणि माझी डिजिटल टीम मला हे सुरळीत होण्यासाठी मदत करत आहे. कृपया माझ्या अकाऊंटवरून आलेले कोणतेही रिक्वेस्ट स्वीकारू नका आणि माझी माहिती कोणीही विचारल्यास त्यांना ती देऊ नका.' पूजाचं अकाऊंट बुधवारी रात्री हॅक झाले आहे. तिच्या डिजिटल टीमने तिची समस्या सोडवली आहे. याबाबतही तिने ट्विट करत माहिती दिली आहे.  

मोठी बातमी ः कर्करोग रुग्णांच्या मदतीसाठी ‘येस टू लाईफ...नो टू टोबॅको’ ऑनलाईन मैफल 

पूजाने सांगितलं की तिच्या डिजिटल टीमने एक तास यावर काम केले आहे आणि सर्व व्यवस्थित केले आहे. तिने लिहिले की,' माझ्या अकाऊंटच्या सुरक्षेसाठी माझ्या टीमने सतत काम केले. या काळात केलेल्या त्वरित मदतीसाठी माझ्या टेक्निकल टीमचे खूप आभार. माझ्या अकाऊंटची समस्या आता ठीक झाली आहे. आता माझं अकाऊंट मला परत मिळालं आहे. गेल्या काही तासांपासून माझ्या अकाऊंटवरून केल्या गेलेल्या पोस्ट डिलिट केल्या जातील.' पूजा ही सोशल मीडिया अकाऊंट हॅक झालेली पहिली सेलिब्रिटी नसून याआधी अमिताभ बच्चन, शाहीद कपूर, ह्रतिक रोशन सारख्या नावाजलेल्या कलाकारांचेही सोशल मीडिया अकाऊंट हॅक करण्यात आले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bollywood actress's instagram account get hacked, she informs by twitter