या वीकेन्डला मोठा धमाका... 12 सिनेमे-वेबसिरीज एकाच दिवशी रिलीज, संपूर्ण लिस्ट एका क्लिकवरMovie Release, OTT Release | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bollywood And Hollywood Movie, Web series latest, weekend release

Movie Release: या वीकेन्डला मोठा धमाका... 12 सिनेमे-वेबसिरीज एकाच दिवशी रिलीज, संपूर्ण लिस्ट एका क्लिकवर

Movie Release: 2022 हे वर्ष आता जवळपास संपायला आलं आहे. हे वर्ष सिनेमांसाठी आधीच्या दोन वर्षांपेक्षा जरा समाधानकारक राहिलं. यावर्षी अनेक चांगले सिनेमे आणि वेब सिरीज रिलीज झाल्या,ज्यांना प्रेक्षकांनी पसंत केलं. येणाऱ्या काळात काही असे सिनेमे आणि सिरीज रिलीजच्या वाटेवर आहेत,ज्यांच्यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पहायला मिळतेय. (Bollywood And Hollywood Movie, Web series latest, weekend release)

हेही वाचा: Animal Movie Look: लांबसडक केस,रक्तानं माखलेला चेहरा अन् कापलेलं नाक...इतका खतरनाक पहिल्यांदाच दिसला रणबीर

चला तर मग,या आठवड्यात रिलीज होणाऱ्या सिनेमांची आणि वेबसिरीजची संपूर्ण लिस्टच एकदा पाहून घेऊया. या लिस्टमध्ये 'चूप' पासून 'भेडिया'पर्यंत सगळ्या कलाकृतींचा समावेश आहे.

चूप

कुठे पहाल- झी5

रिलीज डेट-25 नोव्हेंबर 2022

लास्ट फिल्म शो

कुठे पहाल-नेटफ्लिक्स

रिलीज डेट-25 नोव्हेंबर 2022

खाकी- द बिहार चॅप्टर

कुठे पहाल- नेटफ्लिक्स

रिलीज डेट-25 नोव्हेंबर 2022

गर्ल्स हॉस्टेल 3

कुठे पहाल-झी5

रिलीज डेट-25 नोव्हेंबर 2022

द गार्जियन ऑफ द गॅलेक्सी-हॉलिडे स्पेशल

कुठे पहाल-डिस्ने प्लस हॉटस्टार

रिलीज डेट-25 नोव्हेंबर 2022

मीट क्यूट

कुठे पहाल-सोनी लाइव्ह

रिलीज डेट-25 नोव्हेंबर 2022

भेडिया

कुठे पहाल-थिएटर

रिलीज डेट-25 नोव्हेंबर 2022

प्रिन्स

कुठे पहाल-डिस्ने प्लस हॉटस्टार

रिलीज डेट-25 नोव्हेंबर 2022

हेही वाचा: मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

आणि काय-काय ऑप्शन आहेत त्यावर देखील एक नजर फिरवा...

या सिनेमां व्यतिरिक्त आणि वेब सीरिज व्यतिरिक्त देखील काही ऑप्शन्स आहेत,ज्यांना आपण या वीकेन्डला एन्जॉय करू शकता. २४ नोव्हेंबर रोजी कन्नड सिनेमा कांतारा देखील प्राइम व्हिडीओवर रिलीज झाला आहे. अर्थात हा सिनेमा हिंदीत नाही तर तामिळ,तेलुगू,कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये रिलीज झाला आहे. याव्यतिरिक्त थिएटरमध्ये अजय देवगणचा 'दृश्यम २' रिलीज झालाय, जो खूपच जोरदार कमाई बॉक्सऑफिसवर करताना दिसत आहे. आपल्याकडे आणखी एक ऑप्शन असेल तो 'ब्लॅक पॅंथर-वकांडा फॉरएव्हर'चा.