लांबसडक केस,रक्तानं माखलेला चेहरा अन् कापलेलं नाक...इतका खतरनाक पहिल्यांदाच दिसला रणबीरAnimal Movie Look, Ranbir Kapoor | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ranbir Kapoor Look viral from Animal Movie Set

Animal Movie Look: लांबसडक केस,रक्तानं माखलेला चेहरा अन् कापलेलं नाक...इतका खतरनाक पहिल्यांदाच दिसला रणबीर

Animal Movie Look: रणबीर कपूर आपला आगामी सिनेमा 'एनिमल' च्या शूटिंगमध्ये सध्या व्यस्त आहे. शूटिंगच्या सेटवरनं रणबीरचे वेगवेगळे फोटो अनेकदा समोर आले आहेत. पण त्याचा पूर्ण लूक आतापर्यंत कोणीच पाहिला नव्हता. आता त्याचे लेटेस्ट फोटो व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांना एक मोठं सरप्राइज मिळालं आहे. रणबीरचा 'एनिमल' सिनेमातील लूक समोर आला आहे आणि तो त्यात खूप खतरनाक दिसत आहे.(Ranbir Kapoor Look viral from Animal Movie Set)

सुपरहिट कबिर सिंग सिनेमाचा दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा 'एनिमल' सिनेमाचं दिग्दर्शन करत आहे. या सिनेमातून रणबीर एका वेगळ्याच भूमिकेत आपल्या समोर येत आहे. सिनेमाच्या सेटवरनं रणबीरचे काही लेटेस्ट फोटो व्हायरल झाले आहेत. यामध्ये तो रक्तानं माखलेला दिसत आहे. फोटोत रणबीरचे लांबसडक केस आणि दाढी आपल्याला दिसत आहे. त्याचा चेहरा आणि शर्ट रक्तानं माखलेला आहे आणि नाक तर चक्क कापलेलं आहे.

सोशल मीडियावर रणबीरचे हे फोटो जोरदार व्हायरल झाले आहेत. लोक त्याच्या नव्या लूकला पाहून ब्रूटल आणि डेडली लूक बोलत आहेत. काही नेटकऱ्यांनी दिग्दर्शक संदीप रेड्डीचा व्हिडीओ देखील शेअर केला आहे ज्यात तो म्हणताना दिसत आहे की ,''मला लोकांना दाखवायचं आहे की एक व्हॉयलेन्ट सिनेमा कसा असतो''. काही चाहते तर म्हणताना दिसत आहेत की रणबीर बॉक्सऑफिसची चिंता न करता प्रोजेक्टची निवड करतो.

हेही वाचा: KBC14: केबीसीच्या मंचावरनं अमिताभचा विवाहीत पुरुषांना खास सल्ला; म्हणाले,'बायकोच्या बाबतीत कधीच...'

तसं पाहिलं तर रणबीरचा नवा लूक खरंच खूप जबरी आहे आणि इंट्रेस्टिंग आहे. त्याला पाहून स्पष्ट होतंय की रणबीर पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांना इम्प्रेस करायला सज्ज झाला आहे. या सिनेमात त्याच्या सोबत 'पुष्पा' फेम अभिनेत्री रश्मिका मंदाना देखील पहिल्यांदाच काम करतेय. अनिल कपूर आणि बॉबी देओल देखील या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

हेही वाचा: मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

हेही वाचा: Samantha: 'समंथा हॉस्पिटलमध्ये दाखल झालीच नाही,ती तर... ', आजारी अभिनेत्रीच्या मॅनेजरचा मोठा खुलासा

रणबीर कपूरच्या वैयक्तिक आयुष्याविषयी बोलायचं तर तो आता पिता बनला आहे. रणबीर आणि त्याची पत्नी अभिनेत्री आलिया भट्टनं ६ नोव्हेंबर २०२२ रोजी आपल्या पहिल्या अपत्याला जन्म दिला आहे. त्यांच्या मुलीची एक झलक पहायला चाहते आतुर आहेत. पण कपल मात्र इतक्यात आपल्या बाळाचा चेहरा दाखवेल असं काही वाटत नाही. रणबीर आणि आलियाचं लग्न १४ एप्रिल,२०२२ रोजी झालं होतं. एका खाजगी सोहळ्यात काही मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत दोघांनी लग्न केलं होतं.