मॉं तुझे सलाम...कलाकारांनी असा साजरा केला मदर्स डे

mothers day
mothers day
Updated on

मुंबई : 'स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी' ही ओळ आपल्या कानी पडताच आईची संपूर्ण महती डोळ्यांसमोर उभी राहते. आपण अगदी शाळेत असल्यापासून 'आई' या विषयावर निबंध लिहित आलो आहोत. आई या विषयावर लिहावं तितकं कमीच. वर्षाचे 365 दिवस आई कुटुंबासाठी काम करत असते. आपल्या आवडीनिवडी बाजूला सारुन प्रत्येकाची मनं जपण्यात रमलेल्या आईचा सन्मान करणंही तितकंच गरजेचं आहे. म्हणूनच आईच्या सन्मानाप्रती मदर्स डे साजरा केला जातो. आज मदर्स डे. प्रत्येकाने आपल्या आईचं तोंडभरुन आज कौतुक केलं. 

काहींनी कविता, फोटो शेअर करत आपल्या आई प्रती असणारं प्रेम व्यक्त केलं. यामध्ये कलाकार मंडळीदेखील आपल्या आईचं कौतुक करण्यात मग्न झाले. मॉं तुझे सलाम...म्हणत आपल्या आईसाठी कोणी कविता तयार केली तर कोणी आईसोबतचा फोटो शेअर करत खास संदेश लिहिला. कलाकार मंडळींनी अनोख्या पद्धतीने आईला मातृदिनाच्या शुभेच्छा दिल्या. बिग बी अमिताभ बच्चन यांनी एक खास व्हिडिओ त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे.

'चला पुन्हा बालपण जगुया. लहान मुलं आणि आपलं बालपण यांपासून आपल्याला खूप काही शिकायचं आहे. लहानपणी जेव्हा आपल्याला खोकला, ताप यायचा तेव्हा आपला त्रास आपण आईला सांगायचो...' अशा प्रकारचा व्हिडिओ अमिताभ यांनी शेअर केला आहे.

तर दुसरीकडे अभिनेत्री कंगना रणौतने आईवर खास कविता तयार केली आहे. तिच्या या कवितेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर चांगला व्हायरल झाला आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Dodging them till date. Keep them coming Maa. Love you! 

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09) on

अभिनेत्री सारा अली खानने आई अमृता सिंग आणि आजी रुखसाना सुल्ताना यांचा फोटो शेअर करत मातृदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेता विकी कौशलचा फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Meri Maa ki Maa Thank you for creating Mommy #HappyMothersDay

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95) on

त्याने त्याच्या बालपणीचा आपल्या आईबरोबर समुद्रकिनारी खेळतानाचा फोटो पोस्ट केला आहे. आणि जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. तसेच अभिनेत्री अनन्या पांडेने तिच्या बालपणीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

The answer is still the same love u @bhavanapandey 

A post shared by Ananya  (@ananyapanday) on

या व्हिडिओमध्ये अनन्याचे वडिल अभिनेता चंकी पांडे तिला प्रश्न विचारतात की तू सगळ्यात जास्त प्रेम कोणावर करतेस... यावर ती उत्तर देते आई. तिचा हा व्हिडिओ एकदम क्युट आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

This pretty much sums up mother's day and well... every other day with Tim #HappyMothersDay

A post shared by Kareena Kapoor Khan (@kareenakapoorkhan) on

तसेच ट्विंकल खन्ना, अर्पिता खान, आलिया भट्ट, मीरा राजपुत, करिना कपूर खान यांसारख्या कलाकारांनी देखील एक विशेष पोस्ट शेअर करत मातृदिन साजरा केला आहे.

bollywood celebrities share heartfelt wishes for their moms

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com