विकी कतरिनाच्या लग्नावर सलमानचे वडील म्हणतात, आता.... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विकी कतरिनाच्या लग्नावर सलमानचे वडील म्हणतात, आता....
विकी कतरिनाच्या लग्नावर सलमानचे वडिल म्हणतात, आता....

विकी कतरिनाच्या लग्नावर सलमानचे वडील म्हणतात, आता....

sakal_logo
By
टीम इ सकाळ

मुंबई - बॉलीवूडमधील सध्याची आघाडीची जोडी विकी कौशल आणि कतरिना कैफ पुढील महिन्यात विवाहबंधनात अडकणार आहे. विकी सोबत नाव जोडण्यापूर्वी कतरिनाचे सलमान खान आणि रणबीर कपूरसोबत अफेयर असल्याच्या चर्चा होत्या. अनेकांना त्याबद्दल माहिती आहे. आता त्या प्रकरणावर पडदा पडला असून कतरिना लवकरच विकीशी लग्न करणार आहे. गेल्या काही दिवसांपासून त्या दोघांच्या लग्नाची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. या लग्नाला सलमान खान उपस्थित राहणार का...यावरही चाहते चर्चा करत होते. मात्र तो आपण या लग्नाला उपस्थित राहणार नसल्याचे चाहत्यांकडून सांगण्यात आले आहे.

असं सांगितलं जातं आहे की, विकी आणि कतरिना हे राजस्थानातील एका बड्या हॉटेलमध्ये लग्न करणार आहेत. राजस्थानातील 700 वर्ष जून्या असणाऱ्या एका मोठ्या महालात ते लग्न करणार आहेत. त्या लग्नाविषयी वेगवेगळ्या प्रकारच्या अटीही त्यांनी जाहीर केल्या आहेत. काही करुन आपली प्रायव्हसी जपण्यासाठी त्यांनी लग्नाला येणाऱ्या नातेवाईकांना मोबाईल बंद ठेवण्याची विनंती केली आहे. यासगळ्यात विकी कतरिनाच्या लग्नावर सलमान खानचे वडील प्रख्यात पटकथाकार सलीम खान यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांची प्रतिक्रिया सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे.

हेही वाचा: 'दबंग गर्ल' होणार 'खान कुटूंबियांची' सून?

हेही वाचा: सलमान म्हणाला,''असेल हिंमत तर करून दाखवा''

अखेर सलीम खान यांनी या लग्नावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. एका मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलं की, आता या विषयावर मी काय बोलू...माध्यमांना केवळ याच विषयावर बोलायचे आहे. त्यांच्याकडे हा विषय सोडून दुसरं काही नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे मी या मुद्दयावर आणखी काय वेगळं सांगु...असा प्रश्न सलीम खान यांनी यावेळी उपस्थित केला आहे. कतरिनाचे सलमान खानच्या परिवाराशी सलोख्याचे संबंध आहे. ज्यावेळी सलमान आणि तिच्यामध्ये सर्व काही आलबेल होतं. तेव्हा ती त्यांची एक फॅमिली मेंबर असल्याचे सांगितले जात होते.

loading image
go to top