नोरा फतेहीचं 'Kusu-Kusu' पाहिलं?; लाखो व्ह्युज

नोरा फतेही ही बॉलीवूडमधील आघाडीची सेलिब्रेटी आहे.
नोरा फतेहीचं 'Kusu-Kusu' पाहिलं?; लाखो व्ह्युज

नोरा फतेही ही बॉलीवूडमधील आघाडीची सेलिब्रेटी आहे. प्रामुख्यानं ती तिच्या डान्समुळे ओळखली जाते. सध्या ती वेगवेगळ्या रियॅलिटी शो मध्ये सहभागी झाली आहे. त्यामध्येही ती डान्समुळे चर्चेत असते. आता तिच्या नव्या गाण्याचा टीझर प्रदर्शित झाला आहे. त्या गाण्याचे नाव कुसू कुसू असे आहे. गाण्याचे हटके नाव आणि तितकाच हटके अंदाज यामुळे नोराच्या त्या गाण्याच्या टीझरलाही प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. आतापर्यत 4 मिलियनपेक्षाही अधिक जणांनी तो व्हिडिओ पाहिला आहे.

नोरा फतेहीनं आपल्या या नव्या गाण्याविषयी म्हटलं आहे की, सत्यमेव जयतेमध्ये काम करणं हे माझ्यासाठी खूपच स्पेशल होतं. आणि मी त्यामुळे खूपच आनंदी आहे. यापूर्वी भूजमध्ये मला भूमिका करता आली होती. त्या छोट्याशा भूमिकेमुळे मला प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. त्यांनी त्या भूमिकेचं कौतूकही केलं होतं. त्यापूर्वी दिलबर गाण्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आता निखिल, भूषण कुमार यांची निर्मिती असलेल्या या गाण्याची उत्सुकता आहे. त्यांनी मला संधी दिलीय त्याला न्याय देण्याचा प्रयत्न मी या गाण्याच्या माध्यमातून केला आहे.

या नवीन गाण्याविषयी मिलाप मिलननं सांगितलं की, दिलबर नंतर एक तो कम जिंदगी गाण्यालाही जोरदार प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर आता नोरा कुसू कुसूमध्ये दिसणार आहे. या गाण्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जॉन अब्राहम आणि दिव्या खोसला कुमार यांची भूमिका असलेला सत्य़मेव जयते 2 ची निर्मिती भूषण कुमार, मोनिशा अडवाणी, मधू भोजवानी, निखिल अडवाणी यांनी केली आहे. हा चित्रपट 25 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

नोरा फतेहीचं 'Kusu-Kusu' पाहिलं?; लाखो व्ह्युज
'तारक मेहता'च्या' टप्पू - बबिताचं बिंग अखेर फुटलं
नोरा फतेहीचं 'Kusu-Kusu' पाहिलं?; लाखो व्ह्युज
Movie Review; 'जय भीम' सणसणीत 'चपराक'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com