Zeishan Quadri: ‘गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्यावर पुन्हा फसवणूकीचा गुन्हा दाखल... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Zeishan Quadri

Zeishan Quadri: ‘गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्यावर पुन्हा फसवणूकीचा गुन्हा दाखल...

‘गँग्स ऑफ वासेपूर’ या चित्रपटात डेफिनिटची भूमिका साकारून प्रसिद्धीच्या झोतात आलेला अभिनेता झीशान कादरी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आता तो मोठ्या अडचणीत सापडला आहे. झीशान कादरीविरुद्ध एफआयआर दाखल करत फसवणुकीचा आरोप करण्यात आला आहे.

झीशान कादरीवर रांचीमधील एका हॉटेलचं चक्क २९ लाख रुपये थकीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संदर्भात रांचीमधील हिंदपिढी पोलिस स्टेशनमध्ये झीशान कादरीविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. मात्र अद्याप यासर्व प्रकरणावर त्यांने कोणतेही वक्तव्य केलेले नाही.

हेही वाचा: Shraddha Walker Case: वेबसीरीज ठरतेय का गुन्ह्यांचं गाइडबुक?

दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या ‘गँग्स ऑफ वासेपूर’ या चित्रपटाची कथा झीशानने लिहिली होती. त्यांन या  चित्रपटात सरदार खानच्या तिसरा मुलगा डेफिनेटची भूमिका साकारली होती. झीशानवर अशाप्रकारचे आरोप करण्याची ही पहिली वेळ नाही. याआधीही त्याच्यावर फसवणूकीचे आरोप झाले आहेत.

हेही वाचा: Big Boss 16: एमसी स्टॅनला शालीनसोबतचा वाद नडला; सलमाननं इज्जतच काढली ....

ऑगस्ट 2022 मध्ये, फायनान्सर आणि निर्माती शालिनी चौधरीनेही झीशानवर फसवणूक आणि कार चोरीचा आरोप केला आहे. त्यानंतर मुंबईतील मालाड पोलिस स्टेशनमध्ये झीशानविरुद्ध कलम 420 आणि 406 अंतर्गत गुन्हाही दाखल करण्यात आला होता. शालिनीने आरोप केला होता की, झीशानने तिची केवळ पैशांचीच फसवणूक केली नाही तर तिची ऑडी कार देखील चोरली. त्याचबरोबर झीशानने तिला जीवे मारण्याची धमकीही दिली असल्याचा गंभीर आरोप केला होता. पण त्यानंतर झीशान कादरीने एक निवेदन जारी करत शालिनी यांच्यावर उलटसुलट आरोप केले आणि तिच्या आरोपांना 'पब्लिसिटी स्टंट' म्हटलं होतं.

झीशान कादरी बद्दल सांगायचं झालं तर तो चित्रपटात येण्यापूर्वी कॉल सेंटरमध्ये काम करायचा.  2009 मध्ये अभिनेता बनण्यासाठी तो मुंबईला गेला होता. 'गँग्स ऑफ वासेपूर' सोबतच तो 'रिव्हॉल्वर रानी', 'प्राग', 'हलहल' आणि 'छलांग' सारख्या चित्रपटांसाठीही ओळखला जातो. झीशान कादरीने 'योर ऑनर 2' आणि 'बिछू का खेल' यांसारख्या वेब सीरिजही केल्या आहेत.