esakal | आर्यनला जेलमधलं जेवण जाईना; बिस्किट खाऊन काढतोय दिवस
sakal

बोलून बातमी शोधा

Aryan Shahrukh Khan

आर्यनला जेलमधलं जेवण जाईना; बिस्किट खाऊन काढतोय दिवस

sakal_logo
By
टीम इ सकाळ

मुंबई - बॉलीवूड (bollywood) सध्या हादरलंय त्याचं कारण म्हणजे किंग खान (king khan) शाहरुखच्या (shahrukh khan) मुलाला आर्यन खानला (aryan khan) करण्यात आलेली अटक. एनसीबीनं काही दिवसांपूर्वी आर्यनला ड्रग्ज प्रकरणातील (bollywood drug case) संशयित आरोपी म्हणून अटक केली आहे. अद्याप या प्रकरणाचा तपास सुरु आहे. आज पुन्हा या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. आर्यननं आतापर्यत दोनवेळा जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र त्याला जामीन काही मिळालेला नाही. आजच्या सुनावणीत काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शाहरुखनं आर्यनला जामीन मिळावा म्हणून सलमान खानच्या प्रकरणात वकील असलेल्या अमित देसाई यांना वकीलपत्र दिले आहे. यासगळ्यात आर्यनच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. सध्या तो ऑर्थर रोडवरील तुरुंगात आहे.

ऑर्थर रोडवरील जेलमध्ये सर्वसामान्य कैद्यांना ज्या गोष्टी आणि सुविधा दिल्या जातात त्याच आर्यनलाही देण्यात आल्या आहेत. काही दिवसांपासून आर्यननं जेलमधील जेवण घेण्यास नकार दिल्याची बातमी सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे आर्यन जेलमध्ये असणाऱ्या कँटीनमधून बिस्किटं खावून राहत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. आर्यन खानची आई गौरी खान दोन ते तीन दिवसांपूर्वी त्याला भेटायला गेली होती. त्यावेळी तिनं सोबत आर्यनला आवडणारा बर्गर नेला होता. त्याचे फोटोही व्हायरल झाले होते. दिवसेंदिवस आर्यनच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. एनसीबीच्या वकिलानं देखील आर्यनच्या विरोधात प्रभावी बाजू मांडताना काही पुरावे सादर केल्याची माहिती आहे.

मुंबईवरुन गोव्याला जाणाऱ्या त्या क्रुझवर रेव्ह पार्टी सुरु असल्याची माहिती एनसीबीला मिळाली होती. त्यानंतर त्यांनी कारवाई करुन त्यात अनेकांना अटक केली. याप्रकरणामध्ये बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खान याच्या मुलाला आर्यन खानला अटक करण्यात आली. सध्या तो कोठडीत आहे. आज त्याच्या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. यापूर्वी प्रसिद्ध वकील सतीश मानशिंदे यांनी आर्यन खानचे वकिलपत्र घेतले होते. मात्र त्यांना आर्यनला जामीन मिळवून देण्यात यश न आल्यानं आता त्याच्या वकीलांमध्ये बदल करण्यात आला आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून आर्यनला जेलमधील जेवण जात नसल्यानं त्यानं कॅन्टींनमधील बिस्किटे तो खातो आहे. एका इंग्रजी वृत्तपत्रानं दिलेल्या माहितीनुसार, त्याच्यासाठी शाहरुखनं खास पाण्याच्या बाटल्या आमि काही खाण्याचे पदार्थही दिले आहे. कोर्ट जोपर्यत परवानगी देणार नाही तोपर्यत आर्यनला घरातल्या कुठल्याही वस्तु किंवा खाद्यपदार्थ घेता येणार नाही. असे सांगण्यात आले आहे.

हेही वाचा: 'आर्यन खान आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करांच्या संपर्कात'

हेही वाचा: Drugs Case: अशी होती आर्यन खानची तुरुंगातील पहिली रात्र

loading image
go to top