'मी तुला माफ केलं इरफान': पत्नी सुतापाची भावूक पोस्ट

इरफानच्या अभिनयाचे लाखो चाहते होते. केवळ भारतातच नाही तर जगभरातून त्याच्यावर प्रेम करणारे चाहते होते.
Sutapa and babil
Sutapa and babil

आपल्या अभिनयानं प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणाऱ्या इरफान खानचं (Bollywood Actor Irfan Khan) अकाली निधन झालं आणि बॉलीवूडमधील (Bollywood Actor) एका प्रख्यात अभिनेत्याला प्रेक्षकांनी गमावलं. इरफाननं आपल्या अभिनयानं प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणावर पसंती मिळवली आहे. इरफानच्या अभिनयाचे लाखो चाहते होते. केवळ भारतातच नाही तर जगभरातून त्याच्यावर प्रेम करणारे चाहते होते. आता त्याच्या पत्नीची एक पोस्ट चर्चेत आली आहे. त्यामध्ये तिनं इरफान खान (Irfan Khan Wife) यांच्या वेगवेगळ्या आठवणींना उजाळा दिला आहे. इरफान खान यांची पत्नी सुतापा आणि त्यांचा मुलगा बाबिल हे नेहमी सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट शेयर करताना दिसतात.

सध्या जी पोस्ट व्हायरल झाली आहे त्यामध्ये इरफाननं यावेळी त्यांचा जन्मदिन लक्षात न ठेवल्याबद्दल त्यांना माफ केले आहे. ही पोस्ट शेयर करताना सुतापा या कमालीच्या भावनाशील झाल्या आहेत. त्यांनी काही फोटो सोशल मीडियावरुन शेयर केले आहेत. त्यात इरफान विषयीच्या आठवणींना उजाळा देखील दिला आहे. सुतापा यांनी जो फोटो शेयर केला आहे त्यामध्ये बाबिल आणि अयान हे दोघेही दिसत आहे. नेहमीप्रमाणे मोठ्या उत्साहात साजरा होणाऱ्या वाढदिवसाची आठवण यावेळी मात्र इरफान करुन देण्यास विसरल्याचे सुतापा यांनी सांगितलं आहे. ही पोस्ट शेयर करुन सुतापा यांनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Sutapa and babil
Doobey Viral: डूबे'ची क्रेझ, दीपिका सिद्धांतचा 'गहराइया'

माझा जन्मदिन लक्षात न ठेवल्याबद्दल मी इरफान यांना आता माफ केलं आहे. सुतापा यांनी इंस्टावर लिहिलं आहे की, आम्ही आता तुला माफ केलं आहे. गेल्या ३२ वर्षात माझे 28 जन्मदिवस तु लक्षात न ठेवल्याबद्दल मी आता तुला माफ केले आहे. माझ्या जन्मदिनाच्या आदल्या दिवशी खूप नव्हर्स होते. मला तु अर्ध्यावरच सोडून गेला. याची खंत मला आहेच. मात्र आता मी ते स्विकारले आहे. असेही सुतापा यांनी लिहिलं आहे.

Sutapa and babil
Video: 'ड्रोनमय' झालं दिल्लीचं आकाश

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com