Raksha Bandhan Movie: 'लाज कशी वाटत नाही!' अक्षय कुमार का होतोय ट्रोल? | Akshay Kumar Get Trolled | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raksha Bandhan Movie Updates

Raksha Bandhan: 'लाज कशी वाटत नाही!' अक्षय कुमार का होतोय ट्रोल?

Bollywood Movie Raksha Bandhan: बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar) हा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचे दिसून आले आहे. गेल्या काही वर्षापासुन अक्षय हा त्याच्या चित्रपटांपेक्षा त्यावरील वादांमुळे जास्त प्रकाशझोतात आला आहे. ( Bollywood movie) त्याचा दोन आठवडयांपूर्वी प्रदर्शित झालेला सम्राट पृथ्वीराज हा फ्लॉप झाला. तीनशे कोटींचे बजेट असणाऱ्या या चित्रपटानं तीस ते चाळीस कोटींची कमाई केल्याचे दिसून आले. टॉलीवूडच्या कमल हासन यांचा विक्रम ( Tollywood movie) प्रदर्शित झाला त्यावर प्रेक्षकांनी कौतूकाचा वर्षाव सुरु केला आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विक्रमनं सम्राट पृथ्वीराजपेक्षा कमाई करत नवा विक्रम रचला आहे.

सध्या सोशल मीडियावर अक्षयच्या आगामी रक्षाबंधन या चित्रपटाची चर्चा सुरु (Social media news) आहे. त्यावरुन वादाला सुरुवात झाली आहे. तो वाद एवढा टोकाला गेला आहे की त्यामुळे अनेक नेटकऱ्यांनी अक्षयला अर्वाच्य शब्दांत विचारणा केली आहे. एकानं तर लाज कशी वाटत नाही असे त्याला विचारले आहे. रक्षाबंधनमध्ये अक्षयचा जो लूक आहे त्यावरुन त्याला नेटकऱ्यांनी विचारणा केली आहे. काल अक्षयच्या या चित्रपटाचा ट्रेलर व्हायरल झाला होता. त्याला प्रेक्षकांचा प्रतिसादही मिळाला. मात्र अक्षय ट्रोल झाल्याचे दिसून आले आहे. ट्रेलरमध्ये अक्षय हा आपल्या बहिणीसाठी स्वताच्या प्राणांचे बलिदान देत असल्याचे दिसून आले आहे. त्यात अक्षयचा मिशीमधील लूक हा त्याच्या चाहत्यांना फारसा आवडलेला नाही.

यापूर्वी अक्षयनं त्याच्या अनेक चित्रपटांमध्ये मिशीवाला लूक ठेवून चाहत्यांना चकीत केलं आहे. त्यात बेलबॉटम पासून सम्राट पृथ्वीराजपर्यत. त्यामुळे नेटकऱ्यांनी त्याच्यावर टीकेचा वर्षाव सुरु केला आहे. दरवेळी अक्षय तू त्याच लूकमध्ये असतोस. जसा तू त्याच्या भूमिकेसाठी मेहनत घेतो तशीच मेहनत स्वताच्या लूकसाठी घ्यायला हवी. असं त्याला नेटकऱ्यांनी सुनावले आहे. तर अनेकांनी त्याच्यावर टीका केली आहे.

हेही वाचा: Shabaash Mithu Trailer: 'असं खेळणार की कुणीही ओळख विसरणार नाही'!

पैसे कमविण्यासाठी सगळ्या चित्रपटांमध्ये सेम टू सेम लूक ठेवायला लाज कशी वाटत नाही असा प्रश्न त्याला त्याच्या चाहत्यांनी विचारायला सुरुवात केली आहे. मिशी नसली तरी भूमिका करता येतात की, पण तुझ्या सगळ्या चित्रपटांमध्ये तू त्याच लूकमध्ये दिसतो म्हणून आम्हाला त्यात तोच तोच पणा जाणवतो. यासाठी काही पर्याय आहे की नाही अशी विचारणा केली आहे. अक्षयचा रक्षाबंधन नावाचा चित्रपट हा येत्या 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा: Tiger 3 Teaser Out: बोल्ड अंदाजात करणार प्रेक्षकांना घायाळ ! सलमान कतरिनाचा 'टायगर ३' प्रदर्शित

Web Title: Bollywood Movie Akshay Kumar Raksha Bandhan News Same Look Viral Fans Trolled

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top