Drishyam 2: दृश्यम 2 ची यशस्वी घौडदौड विकेंडला ओलांडला ‘इतक्या’ कोटींचा टप्पा

Drishyam 2
Box Office collection
Drishyam 2 Box Office collectionEsakal

अजय देवगण, तब्बू आणि अक्षय खन्ना स्टारर 'दृश्यम 2' हा 2022 मधील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. हा मिस्ट्री थ्रिलर चित्रपट, जो या शुक्रवारी, 18 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला. अभिषेक पाठक दिग्दर्शित, दृश्यम 2 मध्ये तब्बू, अक्षय खन्ना, इशिता दत्ता, श्रिया सरन आणि सौरभ शुक्ला यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत. अजयचे यात विजयचे कुटुंबाला पुन्हा त्रास देण्यात येतो. त्याच खुनाची केस पुन्हा उघडल्यानंतर तेच सत्र पुन्हा सुरु होतं. त्यातून विजय आणि त्याचं कुटुंब बचावत की आणखी फसत जात हे पाहणे रंजक आहे.

Drishyam 2
Box Office collection
drishyam 2 review : ‘फॅमिली मॅन’चा जोरदार दणका!

 या चित्रपटाला समीक्षकांसह प्रेक्षकांचाही या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाच्या कलेक्शनवरूनही हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडत असल्याचं दिसतय. या चित्रपटाने शुक्रवारी15.38 कोटींची कमाई केली होती आणि शनिवारी ₹ 21.59 कोटी कमावले होते. Boxofficeindia.com वरील अहवालात असे म्हटले आहे: “दृश्यम 2 साठी रविवार महत्वाचा ठरला. यात रविवारी 30% वाढ झाल्याचं दिसलं. रविवारी या चित्रपटाचे कलेक्शन  26.50 ते 27 कोटीच्या दरम्यान असावं.” म्हणजेच या चित्रपटाची आतापर्यंतची एकूण कमाई 61.97 कोटींवर गेली आहे.

हेही वाचा: Shraddha Walker Case: वेबसीरीज ठरतेय का गुन्ह्यांचं गाइडबुक?

पहिल्या भागाचे दिग्दर्शन निशिकांत कामत यांनी केले होते . त्यांचे 2020 मध्ये यकृत सिरोसिसमुळे त्याचं निधन झाले .त्यामूळे अभिषेक पाठक यांनी 2015 च्या चित्रपटाच्या निर्मात्यांपैकी एक म्हणून काम केले होते आणि म्हणून त्यांनी दृष्यम 2 चे दिग्दर्शनासाठी त्यांची निवड करण्यात आली. हिंदी चित्रपट फ्रेंचायझी मोहनलाल आणि दिग्दर्शक जीतू जोसेफ यांच्या मल्याळम चित्रपटावर आधारित आहे. समोर आलेल्या माहितीनुसार हा चित्रपट जवळपास 50 कोटींच्या बजेटमध्ये बनला आहे. या दृष्टिकोनातून या चित्रपटाने विकेंडला बजेटच्या अधिक कमाई केली आहे.

Drishyam 2
Box Office collection
Drishyam 2 : 'दृश्यम 2' ची बॉक्स ऑफिसवर जमवला एवढा गल्ला; प्रेक्षक म्हणताहेत विजय साळगावकर...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com