Gangubai OTT: गंगुबाई ओटीटीवर आली! नेटफ्लिक्सवर होणार प्रदर्शित

बॉलीवूडमध्ये ज्या चित्रपटानं प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला (Bollywood News) पोहचवली होती त्या संजय लीला भन्साळीच्या गंगुबाईला बॉक्स ऑफिसवर प्रचंड यश मिळाले.
Alia Bhatt
Alia Bhattesakal
Updated on

Bollywood Movie: बॉलीवूडमध्ये ज्या चित्रपटानं प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला (Bollywood News) पोहचवली होती त्या संजय लीला भन्साळीच्या गंगुबाईला बॉक्स ऑफिसवर प्रचंड यश मिळाले. त्यानं मोठी कमाई केल्याचे दिसून आले आहे. (Gangubai Kathiyawadi) साधारण दोन महिन्यापूर्वी प्रदर्शित झालेल्या गंगुबाईला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. भन्साळी यांच्या या चित्रपटाच्या बाबत देखील वाद (OTT Movie) निर्माण झाल्याचे दिसून आले होते. गंगुबाई यांच्या परिवारातील एका व्यक्तीनं उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र कोर्टानं ती याचिका फेटाळून लावत चित्रपट प्रदर्शित करण्यावर हिरवा कंदील दाखवला होता. आता गंगुबाई हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

थिटएरमध्ये शंभर कोटींपेक्षा अधिक कमाई करणाऱ्या गंगुबाईची ओटीटीवर एंट्री होणं यामुळे नेटकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. भन्साळी दिग्दर्शित गंगुबाई काठियावाडी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमालीचा हिट झाला होता. आलिया भट्टनं यात प्रमुख भूमिका साकारली होती. हुसैन झैदी यांच्या द माफिया क्वीन्स ऑफ मुंबई या पुस्तकावर आधारित या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली होती. त्यावरुन काही प्रमाणात वादही झाला होता. अखेर भन्साळी यांच्या या चित्रपटाला कोर्टाकड़ून हिरवा कंदील मिळाल्यानं गंगुबाईच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला होता.

Alia Bhatt
IPL Photo Viral: मैदानावर दिसला छोटा 'फ्युचर धोनी'

चालु वर्षीचा बॉलीवूडमधील सर्वाधिक गाजलेला चित्रपट म्हणजे गंगुबाई काठियावाडी. मात्र विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित द काश्मीर फाईल्स जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा गंगुबाईला मोठा धक्का बसला. आता नेटफ्लिक्सनं मोठा निर्णय घेतल्याचे दिसून आले आहे. त्यांच्यावतीनं हा चित्रपट ओटीटीवर 26 एप्रिलपासून प्रेक्षकांना पाहता येणार आहे. नेटफ्लिक्सकडून ही माहिती देण्यात आली आहे. शंभर कोटींची कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये आलियाच्या गंगुबाईचाही समावेश करण्यात आला होता.

Alia Bhatt
Photo Viral: मुलासोबत आमिर खान घेतोय आंब्याचा आस्वाद!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com