The Kashmir Files Movie News| 250 कोटींची कमाई तरीही Anupam Kher यांना एकच खंत, 'मला अजूनही...' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

The Kashmir files Movie News, Anupam Kher News Updates

250 कोटींची कमाई तरीही अनुपम खेर यांना एकच खंत, 'मला अजूनही...'

Bollywood Movies: काश्मीरी पंडितांची वेदना मांडणारा काश्मीर फाईल्स हा आता सातत्यानं चर्चेत येताना दिसत आहे. सोशल मीडियावर देखील या चित्रपटानं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. राजकीय, धार्मिक रंग आता काश्मीर फाईल्सला आला असून त्यामुळे नेटकऱ्यांमध्ये वाद (Anupam Kher) होताना दिसत आहे. देशातील वेगवेगळ्या राज्यांनी काश्मीर फाईल्स प्रेक्षकांनी पाहावा म्हणून विशेष सुट दिली आहे. आसाम सारख्या राज्यानं तर सरकारी अधिकाऱ्यांना एक दिवसाची (The kashmir Files) सुट्टीही दिली होती. काहींनी मनोरंजन कर कमी करुन हा चित्रपट पाहण्याचे आवाहन प्रेक्षकांना केले आहे. बॉक्स ऑफिसवर 250 कोटींची कमाई करुनही अभिनेता अनुपम खेर यांनी आपल्या मनातील खंत बोलून दाखवली आहे, ते काय म्हणालेत हे आपण जाणून घेऊयात. (Anupam Kher News Updates)

विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित काश्मीर फाईल्समध्ये अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी, चिन्मय मांडलेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अकरा मार्चला प्रदर्शित झालेल्या काश्मीर फाईल्सनं देशभर धुमाकुळ घातला आहे. त्यावरुन मोठ्या वादालाही सुरुवात झाली आहे. विविध राजकीय नेते, बॉलीवूड सेलिब्रेटींनी देखील यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काश्मीर फाईल्सचं कौतुक केलं होतं. त्यानंतर काल देशाचे उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू यांनी देखील काश्मीर फाईल्सवरुन जो वाद सुरु झाला आहे त्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. प्रेक्षकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असताना जे राजकारणी त्याच्यावरुन वादग्रस्त विधानं करत आहेत ते चूकीचं असल्याचं नायडू यांनी म्हटलं आहे. अग्निहोत्री यांनी सोशल मीडियावरुन पोस्ट करुन ही माहिती दिली होती.

आता या चित्रपटातील प्रमुख कलाकार अनुपम खेर यांची प्रतिक्रिया व्हायरल केली आहे. अजुनही लोकांनी मोठ्या प्रमाणावर द काश्मीर फाईल्स पाहायला हवा. लोकांनी या प्रश्नावर गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे. ज्या गोष्टी आपल्याकडे घडल्या आहेत त्या जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांचा सहभाग महत्वाचा असल्याचे खेर यांनी म्हटले आहे. दुसरीकडे त्यांनी अग्निहोत्री यांचं कौतुकही केलं आहे. डीएनएनं दिलेल्या माहितीनुसार, एका वनाधिकाऱ्याचा मुलाग जो नॅशनल स्कुल ऑफ ड्रामामधून आला आहे. ज्याला कुणी कधीही हिरो समजलं नाही त्याची भूमिका असणारा काश्मीर फाईल्स जेव्हा 250 कोटींची कमाई करते तेव्हा कळतं की काहीही होऊ शकतं. अशा प्रकारची प्रतिक्रिया खेर यांनी दिली आहे.

हेही वाचा: Kashmir Files ला दुबईत 'ग्रीन' सिग्नल; एकही दृष्य न वगळता 'स्क्रिनिंग'

अजुनही काही लोकं ही खुलेपणानं या चित्रपटाची स्तुती करत नाहीत. ही मला खटकणारी गोष्ट आहे. ज्या चित्रपटाला लोकांनी डोक्यावर घ्यायला पाहिजे तिथे लोकं कौतुक करताना एकमेकांकडे पाहतात या गोष्टीची खंत वाटत असल्याचे खेर यांनी आपल्या एका पोस्टमध्ये म्हटले आहे.

Web Title: Bollywood Movie The Kashmir Files Anupam Kher Share Post Worried About Something

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top