Samshera : 'तू खूप पस्तावशील!' ऋषी कपूर यांनी रणबीरला केलं होतं सावध|Bollywood Movies Samshera rushi Kapoor alert Ranbir Kapoor | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rushi kapoor news

Samshera Movie: 'तू खूप पस्तावशील!' ऋषी कपूर यांनी रणबीरला केलं होतं सावध

Bollywood Movie: बॉलीवूडमधील प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर सध्या त्याच्या कॉफी विथ करणमुळे चर्चेत आला आहे. त्या कार्यक्रमाचे प्रमोशनही जोरात सुरु आहे. बॉलीवूडचे वेगवेगळे सेलिब्रेटी कार्यक्रमात आणून त्यांच्याविषयी धक्कादायक खुलासे सुरु आहेत. यासगळ्यात करणनं अनेकांची नाराजीही (Rushi Kapoor) ओढावून घेतल्याचे दिसून आले आहे. करण जोहरला दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांनी देखील एका गोष्टीबाबत सावध केले होते. ती बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

रणबीर कपूर हा त्याच्या ब्रम्हास्त्रमुळे लाईमलाईटमध्ये आहे. त्यामध्ये आलिया ही (Alia bhatt) मुख्य भूमिकेत आहे. काही दिवसांपूर्वी ब्रम्हास्त्रचा ट्रेलर व्हायरल झाला होता. त्यालाही नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. दुसरीकडे रणबीरच्या (Bollywood actors) समशेराची चर्चाही जोरदार व्हायरल होत आहे. यासगळ्यात अभिनेता ऋषी कपूर यांनी रणबीरला करणवरुन महत्वाचा सल्ला दिला होता. तो म्हणजे तू त्याच्यामुळे खूप पस्तावशील. ते असं का म्हणाले हे आपण जाणून घेणार आहोत. रणबीरनचं हा किस्सा शेयर केला आहे. बॉलीवूड हंगामाशी रणबीर बोलत असताना त्यानं सांगितलं की, करण सोबत तू काम करतो आहेस मात्र त्याच्यासोबत काम करताना तुला पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही.

करण मल्होत्रा हा खूप तयारी करुन घेणारा दिग्दर्शक आहे. तो जे म्हणेल ते तुला करावेच लागेल. परफेक्शन त्याला आवडते. अशावेळी तुला तयारी करावी लागेल. असा सल्ला मला ऋषी कपूर यांनी दिला होता. जेव्हा आपण करणनं केलेली फिल्म पाहतो तेव्हा मात्र जी काही मेहनत केली आहे त्याचे चीज झाले असे वाटते.

हेही वाचा: Ranbir Kapoor: 'नुसतं प्रोटीन खायचं, पाचवेळा जेवायचं!' कसा होता डाएट प्लॅन?

रणबीरनं त्याच्या आगामी समशेरा चित्रपटाबद्दल काही गोष्टी शेयर केल्या आहेत. त्यात तो म्हणतो, समशेरा मध्ये काम कऱणे हे माझ्यासाठी स्वप्नवत होते. त्यात मी प्रचंड मेहनत घेतली आहे. तो अनुभव खरचं संयम पाहणारा होता. दिग्दर्शकानं खूप तयारी करुन घेतली. तो म्हणेल त्यानुसार मी माझ्यातील सर्वोत्कृष्ट देण्याचा प्रयत्न केला आहे. असं रणबीरनं यावेळी सांगितले.

हेही वाचा: Ranbir Kapoor: रणबीरला कोणता आजार जडला? नेटकऱ्यांचा गुगलवर शोध

Web Title: Bollywood Movies Samshera Rushi Kapoor Alert Ranbir Kapoor Director Karan Malhotra

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top