Ranbir Kapoor: 'नुसतं प्रोटीन खायचं, पाचवेळा जेवायचं!' कसा होता डाएट प्लॅन?

अयान मुखर्जी दिग्दर्शित ब्रम्हास्त्रचा ट्रेलर व्हायरल झाला आणि रणबीरच्या लूकची चर्चा सुरु झाली.
Bollywood actor ranbir kapoor
Bollywood actor ranbir kapoor esakal

Ranbir Kapoor Transformation: अयान मुखर्जी दिग्दर्शित ब्रम्हास्त्रचा ट्रेलर व्हायरल झाला आणि रणबीरच्या लूकची चर्चा सुरु झाली. त्यात तो एका वेगळ्याच (Ranbir Bramhastra movie) भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहे. त्यानंतर काही दिवसांपूर्वी त्याचा समशेराचा ट्रेलर व्हायरल झाला होता. त्यात त्याच्या भूमिकेचं प्रेक्षकांनी कौतूक केलं आहे. तो हटक्या स्टाईलमध्ये आहे. सध्या समशेरा आणि (samshera movie) त्यातील रणबीर अशी सोशल मीडियावर चर्चा आहे. त्या भूमिकेसाठी त्यानं वजनही वाढवलं होतं. त्याचा डाएट प्लॅन काय होता, हे आपण जाणून घेणार आहोत. रणबीरनं त्या लूकसाठी मोठी मेहनत घेतल्याचे दिसून आले आहे.

दरम्यानच्या काळात सोशल मीडियावर रणबीरचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये त्याचे बॉडी ट्रान्सफॉर्मेशन दिसून आले आहे. रणबीर जीममध्ये (Bollywood Actor) मेहनत घेत असल्याचा तो व्हिडिओ आहे. वेगवेगळ्या भूमिकांसाठी रणबीर हा ओळखला जाणारा अभिनेता आहे. त्यानं यापूर्वी साकारलेल्या भूमिकांवरुन ते दिसून येईल. बॉलीवूडमध्ये चॉकलेट बॉय अशी प्रतिमा असलेल्या रणबीरनं हटके भूमिका साकारुन आपली ती प्रतिमा बदलण्याचा अनेकदा प्रयत्न केला आहे. त्यात त्याला काही अंशी यश आले आहे. तर बऱ्याचदा टीकेलाही सामोरं जावं लागलं आहे.

रणबीरचे जे आगामी प्रोजेक्ट आहे त्यात त्यानं आपल्या भूमिकेविषयी काळजी घेतली आहे. यामध्ये त्याच्याकडे अयान मुखर्जी यांचा ब्रम्हास्त्र आहे. त्याचीही गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. समशेरामध्ये रणबीरच्या बॉडीनं मात्र नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. रणबीरच्या त्या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट्स दिल्या आहेत. रणबीरनं जेव्हा संजूमध्ये काम केलं होतं तेव्हापासून तो चाहत्यांच्या नजरेत आला. त्याच्यातील अभिनेत्याला प्रेक्षकांकडून मोठी दाद मिळाली होती.

View this profile on Instagram

Yash Raj Films (@yrf) • Instagram photos and videos

Bollywood actor ranbir kapoor
Video: आपल्याला दोन्ही हातच नसेल तर?...

त्या व्हिडिओमध्ये रणबीरनं म्हटलं आहे की, माझ्या आतापर्यतच्या सगळ्या फिल्ममध्ये सर्वाधिक थकवणारी फिल्म म्हणून मी समशेराच्या नावाचा उल्लेख करेल. यात मला खूप वर्क आऊट करावा लागला होता. एकवेळ वजन कमी करणं सोपं आहे. मात्र ते वाढवताना खूप त्रास होतो. ते अवघड काम आहे. मला माझ्या रोलसाठी खूप प्रोटिन्स घ्यावे लागले होते. दिवसभरातून पाचवेळा जेवणे हे काम मला अवघड होते. मात्र जो वर्कआऊट मी करत होतो तो मात्र चांगलाच दमवणारा होता. असेही रणबीरनं सांगितलं आहे.

Bollywood actor ranbir kapoor
Viral Video: गाडीचा हॉर्न वाजला, नागोबा डुलायला लागले! एक मोरही

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com