राखी सावंतने थेट टॉयलेटमधून शेअर केला व्हिडीओ,नेटकऱ्यांचा संताप अनावर...Rakhi Sawant Video, Rakhi Sawant at Rizwan Palace Toilet Duba | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rakhi Sawant at Rizwan Palace Toilet Dubai,Video Viral

Rakhi Sawant Video: राखी सावंतने थेट टॉयलेटमधून शेअर केला व्हिडीओ,नेटकऱ्यांचा संताप अनावर...

Rakhi Sawant Video: राखी सावंत नाव ऐकलं तर , एकच गोष्ट आठवते ते म्हणजे तिची ओव्हर अक्टिंग आणि नको ते तिचे किस्से. राखी सावंत ही कोणत्या कोणत्या कारणाने चर्चेत राहतेच मग ते कारण कोणतेही असो.राखी असं काहीतरी करते आणि ट्रोलरच्या निशाण्यावर येते.(Rakhi Sawant at Rizwan Palace Toilet Dubai,Video Viral)

हेही वाचा: Shraddha Murder Case: 'या' टी.व्ही अभिनेत्याकडे श्रद्धानं मागितलेली मदत, शॉकिंग खुलासा करत म्हणाला...

सध्या राखी सावंत दुबईमध्ये फिल्मफेअरच्या कार्यक्रमांमध्ये तिच्या नवीन बॉयफ्रेंड आदिल खान दुर्रानीला घेऊन गेली आहे. दुबईमध्ये रणवीर सिंगने रेस कार इव्हेंटला भेट दिली,तर त्याला तेथील एका पत्रकारानं ओळखलं नाही तेव्हा त्यानं दिलेल्या स्मार्ट उत्तराचा व्हिडीओ चर्चेत आला. त्याहून अधिक भाव खाऊन गेला तो दुबईत सिंहाच्या पिल्लाला पाहून घाबरलेल्या शहनाझ गिलचा.

हेही वाचा: गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....

पण राखी सावंतच काहीतरी वेगळंच चालू आहे दुबईत. अर्थात ती आहेच म्हणा अतरंगी. काही नाहीतर तिनं दुबईतील एका टॉयलेटमधला व्हिडीओ शेअर केला आहे. ती दुबईच्या हॉटेलमधील एका गोल्डन कलरच्या बाथरूमची आणि वॉश बेसिंगची ओळख करून देत आहे, आणि बाथरूमधील रूटींग मीडीयाला दाखवते आणि एक पाऊल पुढे जात तिथं काय करतात हे कृती करुन दाखवते आहे, आणि वर म्हणताना दिसते,' हे सगळं चोरी करणार'. तिच्या या व्हिडिओवर नेटकरी मात्र संतापले आहेत. आणि कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत.

एकाने लिहिले "अग राखी आम्ही पण रोज सकाळी बाथरूममध्ये जातो ग आणि कसं काय धुवायचं माहिती आहे" एक तर इतका भडकला आहे " मुळात हिला तिथे घेऊन का गेले आणि बोलवले का, इज्जत काढते आहे " " राखी पहिल्यांदा गेली आहे म्हणून अशी करते आहे" "राखी तु चेहऱ्याने चोर दिसते आहे" दुसऱ्या एका नेटकऱ्या ने लिहिले " राखी तु चोरी करशील आणि नाव त्या आदिलवर येईल" "अग राखी असं नको करूस परत ब्रेकअप होईल". तर असा हा राखी सावंतचा अतरंगी व्हिडीओ बातमीत जोडलेला आहे,नक्की पहा.