
Azaan Row: मशिदीवरील भोंग्याप्रकरणी अनुराधा पौडवाल म्हणाल्या, 'भारतामध्ये आता...'
Bollywood News: मनसेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडव्याच्या निमित्तानं घेतलेल्या मेळाव्यात मशिदीवरील भोंगे हटविण्याची मागणी केली होती. जर ते हटवले गेले नाहीत तर त्यासमोर हनुमान चालिसा (Hanuman Chalilsa) लावण्यात यावी असे सांगितले होते. त्यावरुन काही दिवस मोठ्या प्रमाणात वाद होताना दिसतो आहे. वेगवेगळ्या राजकीय नेत्यांनी (Bollywood Celebrities) प्रतिक्रिया दिल्या होत्या. अनेक बॉलीवूडच्या सेलिब्रेटींनी देखील आपलं मत याप्रकरणावर व्यक्त केलं होतं. सध्या सोशल मीडियावर हा विषय चर्चेतील असून त्यात प्रख्यात गायिका अनुराधा पौडवाल (Anuradha Paudwal) यांनी देखील अजान प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांची प्रतिक्रिया चर्चेत आली आहे. त्या काय म्हणाल्या हे आपण जाणून घेणार आहोत.
बॉलीवूडमध्ये (Bollywood Gossip) आपल्या गोड आवाजानं चाहत्यांचे लक्ष वेधून घेणाऱ्या गायिका म्हणून अनुराधा यांची ओळख आहे. त्यांनी तीन दशकांहून अधिक बॉलीवूडमध्ये आपल्या गायकीनं स्वतंत्र स्थान निर्माण केलं आहे. सध्या त्या अजान प्रकरणावरील प्रतिक्रियेमुळे चर्चेत आहेत. त्या म्हणतात, भारतामध्ये आता अजानसाठी लाऊडस्पिकरचा वापर करणं बंद करायला हवा. आपल्या देशामध्ये दरवेळी वेगवेगळ्या प्रकारच्या निर्णयांची काही गरज नाही. मी माझ्या गायनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं अनेक देशांचे दौरे केले. त्यामध्ये मला अजानसाठी लाऊडस्पिकर हे फक्त भारतातच दिसलं. अन्य देशांमध्ये असे काही नाही. मी कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही. मात्र जर कोणत्याही चुकीच्या गोष्टीला जाणीवपूर्वक प्रोत्साहन दिले जात असेल तर त्याचा विचार व्हायला हवा.
हेही वाचा: Audience Review: मी वसंतराव - संघर्षाचा सांगीतिक प्रवास
जर मशिदीमध्ये अजानसाठी लाऊडस्पिकरचा वापर केला जातो तर बाकीच्या धर्माचे लोक विचारणारच की आम्हाला देखील लाऊडस्पिकरचा वापर करण्याची परवानगी द्या. झी न्युजला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये पौडवाल यांनी या प्रकरणावर आपली भूमिका मांडली. मी जेव्हा मध्य पूर्व देशांमध्ये गेले तेव्हा त्याठिकाणी लाऊडस्पिकरवर बंदी असल्याचे दिसून आले. तर मग भारतामध्ये अशा गोष्टींची काय गरज आहे. हे जर असेच सुरु राहिले तर लोक कालांतरानं त्या लाऊडस्पिकरवर हनुमान चालिसा लावतील. असंही पौडवाल यांनी यावेळी सांगितलं.
हेही वाचा: RRR Review- नावं ठेवायचा विषयच नाही, स्टोरी दणदणीत अभिनय खणखणीत
Web Title: Bollywood Singer Anuradha Paudwal Reaction On Again Loudspeakers Muslim Countries
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..