सात वर्षांपासून 'बॉबी डार्लिंग' गायब?, 'बायसेक्शुअल' मुळे मिळेना काम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bobby Darling
सात वर्षांपासून 'बॉबी डार्लिंग' गायब?, 'बायसेक्शुअल' मुळे मिळेना काम

सात वर्षांपासून 'बॉबी डार्लिंग' गायब?, 'बायसेक्शुअल' मुळे मिळेना काम

बॉलीवूडमधील (Bollywood) एक प्रख्यात सेलिब्रेटी म्हणून बॉबी डार्लिंगला (Bobby Darling) ओळखलं जातं. ती बायसेक्शुअल असल्यानं तिला बराच काळ बॉलीवूडमध्ये काम न मिळाल्यानं ती सात वर्षांपासून अज्ञातवासात आहे. आतापर्यत तिनं वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. बॉलीवूडमधल्या अनेक सेलिब्रेटींशी तिची ओळख आहे. मात्र त्याचं बॉलीवूडमधून अचानक गायब होणं अनेकांसाठी धक्कादायक म्हणावं लागेल. काहींनी त्याच्या वैयक्तिक गोष्टींवरही भाष्य केल्यानं तो चर्चेत आला होता. 1999 मध्ये बॉबीनं ताल (Taal) आणि बॉबी (Bobby) या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये (Bollywood) पदार्पण केलं होतं. मात्र हा प्रवास काही काळानं थांबला.

बॉबीचा बॉलीवूडमधला प्रवास अर्ध्यावरच थांबण्याचे कारण म्हणजे त्याचं बायसेक्शुअल (Bisexual) असणं. यामुळे त्याला अनेकांकडून वेगवेगळ्या प्रकारच्या टीकेला सामोरं जावं लागलं आहे. त्याच्यावर जे नाही ते आरोपही झाले. बॉलीवूडमध्ये सुरुवातीच्या काळात त्याचे जे मित्र होते त्यांनी तोंड फिरवले. याचा मोठा मानसिक परिणाम बॉबीवर झाला. आणि तो बॉलीवूडपासून लांब झाला. गेल्या सात वर्षांपासून तो बॉलीवूडपासून लांब आहे. सध्या तो कुठे आहे याचीही कुणाला माहिती नाही. मात्र त्यानं सध्या सोशल मीडियावरुन आपल्याविषयी जो अपप्रचार झाला त्याच्याविषयी खुलासा केला आहे.

हेही वाचा: 'खरे बंटी बबली कोण?' सैफ अन् राणी दोघेही हैराण...

2014 पासून बॉबी हा बॉलीवूडपासून लांब गेला. ईटाइम्सशी बोलताना त्यानं सांगितलं की, मी बायसेक्शुअल असल्यानं त्यामुळे मला कुणीही काम देत नव्हतं. त्यावरुन मला ट्रोलही व्हावं लागलं. त्याचा मोठा परिणाम माझ्या मानसिक आरोग्यावर झाला. मी गे नाही आणि ट्रान्सही नाही. त्यामुळे मला कुणी माझ्या अर्थानं समजून घ्यायलाही तयार नाही. आता माझ्याजवळ काहीही काम नाही. आता माझं शरीर हे स्त्रीचे झाले आहे. मी सर्जरी केली आहे. मी काही काळ एकांतात आहे. बॉबीनं आता एलजीबीटीक्युंसाठी काम करण्यासही सुरुवात केली आहे. त्यांच्या हक्कांसाठी लढण्यात आपल्याला समाधान मिळाल्याचेही तिनं सांगितलं.

हेही वाचा: Movie Review; 'जय भीम' सणसणीत 'चपराक'

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top