'रानबाजार'साठी माधुरी पवारने केलं टक्कल.. भलतीच गाजतेय भूमिका... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

marathi actress madhuri pawar in ranbazar web series

'रानबाजार'साठी माधुरी पवारने केलं टक्कल.. भलतीच गाजतेय भूमिका...

Ranbazar : रानबाजार या नुकत्याच आलेल्या वेन सिरीजची बरीच चर्चा आहे. या सिरीजच्या टिझर पासूनच वादाला सुरुवात झाली होती. युवा वेब सिरीज मध्ये बोल्ड दृश्य दाखवल्याने मोठ्या प्रमाणात टीका केली गेली पण हा रोष आता मावळतान दिसतोय. या सिरीजच्या ट्रेलर मधून अनेक बड्या कलाकारांचे चेहरे समोर आले. हा राजकीय, सामाजिक थरार असल्याचे या ट्रेलरने उघड केले. नुकतीच हि वेब सिरीज प्लॅनेट मराठी ott (planet marathi ott) वर प्रदर्शित झाली. आता नवनवीन प्रतिक्रिया समोर येत आहेत. सध्या चर्चा आहे ती ;लावणी क्वीन माधुरी पवार हिच्या भूमिकेची.. (ranbazar marathi web series) (madhuri pawar in ranbazar web series)

हेही वाचा: 'कलाकारांपेक्षा घोडीच महाग..' प्रवीण तरडेंनी सांगितला भन्नाट किस्सा

माधुरी पवारने आजवर तिच्या नृत्याने आपल्याला वेडं केलं. तिने मालिका विश्वातूनही आपल्या भूमिकेची जादू दाखवली. आता एक पायरी वर जात तिथे थेट वेबसिरीजमध्ये प्रवेश केला आहे. रानबाजार वेब सिरीज मध्ये माधुरीने 'प्रेरणा सयाजीराव पाटील' ही भूमिका साकारली आहे. या भूमिकेसाठी तिने टक्कल केल्याची चर्चा आहे. राजकारणातील एका मुत्सद्दी स्त्रीची भूमिका माधुरीने चोख साकारली आहे. अलीकडच्या काळात सौंदर्याची परिमाणं बदलत असताना अशा पद्धतीने स्वतःला प्रेक्षकांसमोर आणणं हे धाडसच म्हणावं लागेल.

हेही वाचा: 'चंद्रमुखी'च्या यशानंतर अमृता खानविलकर तुळजापूरात.. पाहा खास व्हिडीओ..

यात माधुरीची (प्रेरणा) भूमिका अत्यंत महत्वची आहे. वडिलांच्या निधनानंतर राजकीय वारसासाठी तिने केलेली खेळी, जनतेच्या मनात स्थान मिळविण्यासाठी वडिलांच्या निधनानंतर केलेलं मुंडन आणि प्रचंड राजकीय महत्वाकांक्षा.. हे पाहून प्रेक्षक भारावून गेले आहेत. या भूमिकेविषयी बोलताना माधुरी म्हणाली, 'अशी भूमिका मिळणं हे माझ्यासाठी अनपेक्षित होतं. पण ती माझ्या वाट्याला दिग्दर्शक अभिजीत पानसे यांच्यामुळे आली. या भूमिकेसाठी मी खूप मेहनत घेतली. राजकीय व्यक्तींना भेटले. त्यांच्या देहबोलीचा भाषेचा आभ्यास केला. राजकारणातील स्त्रियांवरील पुस्तकं वाचली. इतकंच नव्हे तर शिव्याही शिकले. व्यक्तिरेखेसाठी शिव्या देण्याचीही प्रॅक्टिस केली. प्रेरणा सायाजीराव पाटील साने या भूमिकेमुळे माझी अभिनयाच्या भूक भागली आहे, असे म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.'

Web Title: Marathi Actress Madhuri Pawar Bald Look In Ranbazar Marathi Web Series

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top