esakal | बॉलीवूडमधल्या बाजीराव मस्तानीचा अलिबागमध्ये महल, जागेची खरेदी
sakal

बोलून बातमी शोधा

बॉलीवूडमधल्या बाजीराव मस्तानीचा अलिबागमध्ये होणार महल: जागेची खरेदी

बॉलीवूडमधल्या बाजीराव मस्तानीचा अलिबागमध्ये होणार महल: जागेची खरेदी

sakal_logo
By
युगंधर ताजणे

बॉलीवूडची लोकप्रिय जोडी म्हणून रणवीर सिंग आणि दीपिकाकडे पाहिले जाते. या दोघांनी जे चित्रपट केले आहेत ते बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी झाले आहेत. मग तो राम लीला असो किंवा बाजीराव मस्तानी या चित्रपटांना बॉक्स ऑफिसबरोबरच प्रेक्षकांनीही पसंत केलं होतं. सध्या या जोडीनं अलिबागमध्ये एक बंगला खरेदी केल्याची चर्चा जोरदारपणे सुरु झालीय. त्या बंगल्यासाठी जागेच्या खरेदीबाबत ते अलिबागमध्ये आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. ते सोमवारी सकाळी अलिबागमधील दुय्यम निबंधक कार्यालयात आले होते. अलिबागमध्ये हे दोन्ही कलाकार आल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच त्यांना पाहण्यासाठी या कार्यालयाबाहेर अनेकांनी गर्दी केली होती. मापगाव परिसरात जागा खरेदी केली होती.

अलिबाग हे पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचे मानले जाते. येथील आकर्षित ठरणारा समुद्र किनारा, नारळी पोफळीची झाडे पर्यटकांना नेहमीच भुरळ घालतात. त्यामुळे अलिबागला मोठ्या प्रमाणात पसंती दर्शविली जाते. अलिबागच्या निसर्गरम्य ठिकाणी जागा घेऊन शांतपणे राहणे सर्वांनाच आवडू लागले आहे. त्यामुळे मांडवा, किहीम, रेवस, नागाव, रेवदंडा, आक्षी, अशा अनेक ठिकाणी राजकीय, उद्योजकांनी जागा घेऊन बंगले बांधले आहेत. सिने कलाकारदेखील यामध्ये मागे नसल्याचे दिसून येत आहे.

अलिबाग तालुक्यात शाहरुख खानसह अनेक सिने कलाकारांनी जागा घेऊन बंगले बांधले आहेत. सिनेसृष्टीतील आघाडीचे कलाकार रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यांनी तालुक्यातील मापगाव या परिसरात 90 गुंठे जागा 22 कोटी रुपयांना खरेदी केली आहे. या जागेच्या बाबतीत शासकिय कामानिमित्त हे दोघे अलिबागमधील दुय्यम निबंधक कार्यालयात सोमवारी सकाळी आले होते. या दोघांना पाहण्यासाठी त्यांच्या चाहत्यांनी गर्दी केली होती. अनेकांनी या दोघांचे फोटो मोबाईलवरून काढण्याचा आनंद त्यांच्या चाहत्यांनी घेतला.

हेही वाचा: रणवीर सिंगचा आईसोबत जबरदस्त डान्स; पाहा व्हिडीओ

हेही वाचा: 'हा तर मराठीतला रणवीर सिंग'; अभिजीतच्या फोटोवर कमेंट्सचा पाऊस

loading image
go to top