तिरळ्या डोळ्यांचा रणवीर गेला भाव खाऊन; 'सर्कस' च्या मोशन पोस्टरचा मोठा धमाका... Rohit Shetty cirkus Movie, Ranveer SIngh | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ranveer Singh Rohit Shetty cirkus motion poster promises explosive comedy entertainer

Cirkus Poster: तिरळ्या डोळ्यांचा रणवीर गेला भाव खाऊन; 'सर्कस' च्या मोशन पोस्टरचा मोठा धमाका...

Cirkus Movie: दिग्दर्शक रोहित शेट्टी आणि रणवीर सिंग यांच्या जोडीनं प्रेक्षकांना 'सिम्बा' सारखा धमाकेदार सिनेमा दिला आहे. आता पुन्हा एकदा ही जोडी एक मजेदार सिनेमा घेऊन येतेय,पण यावेळी रोहित शेट्टी कोणताही गंभीर धाटणीचा सिनेमा घेऊन नाही तर कॉमेडी सिनेमा घेऊन येतोय. सिनेमाचं नाव 'सर्कस' असे आहे. आता नाव 'सर्कस' असल्यावर सिनेमा किती जबरदस्त असेल याचा अंदाज आलाच असेल आपल्याला.(Ranveer Singh Rohit Shetty cirkus motion poster promises explosive comedy entertainer)

हेही वाचा: Bhediya Twitter Review: वरुण धवनचा 'भेडिया' पाहून पब्लिक कन्फ्यूज; प्रतिक्रिया देत म्हणू लागले...

याआधी रोहित शेट्टीने 'गोलमाल' आणि त्याचे सीक्वेल्स, 'ऑल द बेस्ट' आणि 'बोल बच्चन' सारखे कॉमेडी सिनेमे केले आहेत. रणवीर सिंग सारखा तुफान एनर्जी असलेला अभिनेता रोहितच्या सोबत असल्यानं दोघं मिळून पडद्यावर कॉमेडीची जोरदार बरसात करतील यात शंका नाही. आणि ही गोष्ट 'सर्कस'च्या मोशन पोस्टरमध्ये स्पष्ट दिसत आहे. शुक्रवारी २५ नोव्हेंबर रोजी 'सर्कस'च्या मेकर्सनी सोशल मीडियावर सिनेमाचा मोशन पोस्टर शेअर केला आहे. हे पोस्टर शेअर करत लिहिलं आहे की,''पुढील आठवड्यात ट्रेलर रिलीज, त्याआधी भेटा आमच्या सर्कसच्या कुटुंबाला...''

हेही वाचा: Kantara: रश्मिकासोबत काम करण्यास 'कांतारा'च्या ऋषभ शेट्टीचा नकार?;व्हायरल व्हिडीओत स्पष्टच बोलताना दिसला

रणवीर सिंगनं आतापर्यंत संपूर्ण विनोदी सिनेमा असा कोणताच केलेला नाही. पण सर्कसमुळे आता हे बदलणार आहे. बोललं जात आहे की, या सिनेमात रणवीर पहिल्यांदा डबल रोलमध्ये देखील दिसणार आहे. त्याच्यासोबत पूजा हेगडे आणि जॅकलिन फर्नांडीस या अभिनेत्री देखील सिनेमात दिसणार आहेत. सर्कसमध्ये जे इतर सहकलाकर आहेत ती कॉमेडीतील मातब्बर मंडळी आहेत.

हेही वाचा: मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

जॉनी लिव्हर, संजय मिश्रा,सिद्धार्थ जाधव,ब्रजेश हिरजी,टीकू तल्सानिया आणि मुकेश तिवारी सारखे कलाकार सर्कस सिनेमात कॉमेडीचा धमाका करताना दिसणार हे नक्की. मोशन पोस्टरमध्ये ज्या व्यक्तिरेखा दाखवल्या आहेत त्यातील कितीतरी चेहरे अनेकदा रोहित शेट्टीच्या सिनेमात आपण पाहिले असतील,त्यातील दोन नावं म्हणजे मराठीतील प्रसिद्ध अभिनेते विजय पाटकर आणि सिद्धार्थ जाधव.

रोहित शेट्टी आणि रणवीर सिंगचा 'सर्कस' सिनेमा ख्रिसमसच्या मुहूर्तावर लोकांचे मनोरंजन करण्यासाठी येत आहे. 'सर्कस'चा ट्रेलर २ डिसेंबरला रिलीज होणार असल्याचं बोललं जात आहे. रणवीरच्या पोस्टनंतर ही गोष्ट कन्फर्म असल्याचं दिसून आलं आहे. सर्कस २३ डिसेंबरला रिलीज होत आहे. रणवीर सिंगच्या सिनेमांविषयी बोलायचं झालं तर २०२२ मध्ये आलेला त्याचा सिनेमा 'जयेशभाई जोरदार' बॉक्सऑफिसवर तोंडावर आपटला होता.

हेही वाचा: Marathi Serial: 'आयुष्यात सगळंच अनिश्चित...',हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या रुपाली भोसलेची पोस्ट चर्चेत

तसंच,त्याआधी रिलीज झालेल्या '८३' ने देखील फारशी काही समाधानकारक कमाई नव्हती केली. सर्कसचे मोशन पोस्टर,आणि सिनेमात काम करत असलेले कलाकारांचे लूक आणि बॅकग्राऊंड म्युझिक खूपच मजेदार दिसत आहे. आता सिनेमाही लोकांना तितकाच मजेदार वाटला तर या वर्षाचा शेवटचा आठवडा बॉलीवूडला एक हीट देऊन जाईल अशी आशा करायला हरकत नाही.