Malang Trailer: दिशाचा हॉटनेस अन् आदित्यचा हटके अंदाज, पाहा 'मलंग'चा ट्रेलर

वृत्तसंस्था
मंगळवार, 7 जानेवारी 2020

Malang Trailer : नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'मलंग' या चित्रपटाच्या ट्रेलरनंचर सोशल मीडियावर सध्या त्याचीच चर्चा पाहायला मिळतेय. अभिनेता आदित्य रॉय कपूर आणि दिशा पटानी ही जोडी पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसणार आहेत.

मुंबई : नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे आणि त्याचसोबत नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाले आहेत. यावर्षी दमदार चित्रपटांची मेजवानी प्रेक्षकांना मिळणार आहे. त्याचसोबत वेगवेगळ्या जोड्या आणि विषयही चित्रपटातून पाहायला मिळणार आहेत. अशीच एक नवीन जोडी 'मलंग' या चित्रपटातून दिसणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. 

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'मलंग' या चित्रपटाच्या ट्रेलरनंचर सोशल मीडियावर सध्या त्याचीच चर्चा पाहायला मिळतेय. अभिनेता आदित्य रॉय कपूर आणि दिशा पटानी ही जोडी पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसणार आहेत. यामध्ये आदित्यचे 'अॅब्स' ची फिट बॉडी आणि त्याचा दमदार अंदाज पाहायला मिळतोय. तर, बॉलिवूडची सुपरफिट अभिनेत्री दिशाचा हॉट अंदाज दिसतो आहे. 

दोन मुलांची आई असलेली 'ही' अभिनेत्री चक्क तिसऱ्यांदा प्रेमात !

दिशा आणि आदित्यची लव्हस्टोरी मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. पण, सिनेमामध्ये या लव्हस्टोरीचा वेगळाच ट्विस्टही असणार आहे. सिनेमामध्ये अनिल कपूर आणि कुणार खेमूही मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. लव्हस्टोरी आणि मग व्हिलेन अशी काहीशी सिनेमाची कथा आहे. मात्र नक्की कोणता अभिनेता व्हिलेन असणार हे समजलेले नाही. त्यासाठी चित्रपटाची वाट पाहावीच लागेल. 'एक विलेन' चित्रपटाचं दिग्दर्शन केलेल्या मोहित सुरीने याचं दिग्दर्शन केलं आहे. मलंग 7 फेब्रुवारीला चित्रपटगृहात दाखल होणार आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

MALANG

A post shared by @ adityaroykapur on

दिशाच्या हॉटनेसचं सिक्रेट
या चित्रपटामध्ये दिशाच्या अभिनयासह आणखी एक गोष्ट चाहत्यांचं लक्ष वेधून घेते आहे. दिशाची सुपरफिट बॉडी आणि ऑरेंज बिकीनीमधील तिचा हॉट अंदाजाने चाहत्यांना भूरळ घातलेय. यामध्ये ती 'वॉशबोर्ड ऐब्स' दाखवतेय. पण, त्यासाठी दिशाने प्रचंड मेहनत घेतली. त्याच्या ट्रेनिंगचे व्हिडीओ दिशाने इन्साग्रामवर शेअर केले आहेत.

अनुरागने बदलला ट्विटरचा प्रोफाइल फोटो, थेट मोदी-शहांना केलं टार्गेट

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Training after ages with my coach @rakeshyadav13  trying to relearn the basics #backhandspring

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bollywoods new movie malang trailer released