Indrani Mukherjea Docu Series : मुंबई हायकोर्टाचा इंद्राणी मुखर्जी सीरिजला दणका, प्रदर्शन थांबवलं!

सीबीआयनं (Indrani Mukherjea Docu Series) मुंबई हायकोर्टामध्ये धाव घेतली होती.
Indrani Mukherjea Netflix Serise
Indrani Mukherjea Netflix Serise esakal

The Indrani Mukerjea Story The Buried Truth : नेटफ्लिक्सवर सध्या ज्या डॉक्युसीरिरजी चर्चा आहे त्या द इंद्राणी मुखर्जी स्टोरीच्या प्रदर्शनाला मुंबई हायकोर्टानं स्थगिती दिली आहे. पुढील आदेश येईपर्यत ही मालिका प्रदर्शित होणार नाही. असे सांगण्यात येत आहे.

सीबीआयनं इंद्राणी मुखर्जी डॉक्युसीरिच्या विरोधात स्पेशल कोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर त्या कोर्टानं मेकर्सला दिलासा होता. मात्र सीबीआयनं मुंबई हायकोर्टामध्ये दाद मागितली होती. यानंतर मुंबई कोर्टानं दिलेल्या निर्णय मेकर्ससाठी धक्कादायक मानला जात आहे. पुढील आदेशापर्यत या मालिकेच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यात आल्याची माहिती आहे. हिंदूस्थान टाईम्सनं याबाबत वृत्त दिलं आहे.

सीबीआयनं आपल्या याचिकेमध्ये असे म्हटले होते की, ही मालिका प्रदर्शित झाल्यास त्यामुळे या केसशी संबंधित ज्या व्यक्ती आहेत त्यांच्यावर वेगळा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच या घटनेचा तपास आणखी वेगळ्या दिशेनं जाईल. असेही म्हटले जात आहे. त्यामुळे आता कोर्टानं याबाबत काही महत्वाचे निरीक्षणं नोंदवली आहेत.

कोर्टानं म्हटलं आहे की, मेकर्सनं आता सीबीआयच्या अधिकाऱ्यांसाठी खास स्क्रिनिंगचे आयोजन करावे. त्यानंतर योग्य तो निर्णय घेण्यात येईल. त्यामुळे या मालिकेचे प्रदर्शन तात्पुरते स्थगित करण्यात यावे. असे कोर्टानं म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपासून इंद्राणी मुखर्जी प्रकरणावरुन वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा सुरु आहेत.

Indrani Mukherjea Netflix Serise
Indrani Mukherjee Story : शीना बोरा हत्याकांडावरील माहितीपट प्रकरणी कोर्टात गेलेल्या 'CBI'ला कोर्टाचा दणका, याचिका फेटाळली!

शीना बोरा या आपल्या २४ वर्षांच्या मुलीचा खून केल्याच्या आरोपावरून इंद्राणी मुखर्जी यांना अटक करण्यात आली होती. मात्र त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं जामीन दिल्यानंतर इंद्राणी मुखर्जी या सध्या तुरुंगाबाहेर असल्याची माहिती आहे. नेटफ्लिक्सवर या घटनेवर आधारित मालिका ‘The Indrani Mukerjea Story: Buried Truth’ ही उद्या २३ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com