esakal | ब्रेकिंग- ६५ वर्षावरिल ज्येष्ठ कलाकारांना शूटींगची परवानगी, मुंबई हायकोर्टाचा निर्णय
sakal

बोलून बातमी शोधा

65 year old celebs allowed on shooting

६५ वय वर्षाच्या वरिल व्यक्तिंना कोरोनाचा संसर्ग लवकर होऊ शकतो या कारणामुळे त्यांना शूटींग करण्यास सक्त मनाई होती. मात्र आता या कलाकारांसाठी आनंदाची बातमी आहे. 

ब्रेकिंग- ६५ वर्षावरिल ज्येष्ठ कलाकारांना शूटींगची परवानगी, मुंबई हायकोर्टाचा निर्णय

sakal_logo
By
दिपालीराणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- कोरोना व्हायरसच्या काळात मनोरंजन विश्वातील शूटींगला पूर्णपणे बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर अनलॉकच्या दिशेने पाऊल टाकताना हळूहळू शूटींगलाही परवानगी देण्यात आली होती. मात्र ६५ वय वर्षाच्या वरिल व्यक्तिंना कोरोनाचा संसर्ग लवकर होऊ शकतो या कारणामुळे त्यांना शूटींग करण्यास सक्त मनाई होती. मात्र आता या कलाकारांसाठी आनंदाची बातमी आहे. 

हे ही वाचा: बिग बॉस फेम आसिम रियाजवर बाईकस्वारांनी केला हल्ला

महाराष्ट्र सरकारने वयस्कर लोकांना कोरोनाचा लवकर होणारा प्रादुर्भाव लक्षात घेता ६५ वर्षावरिल कलाकारांना शूटींगला येण्यास परवानगी नाकारली होती. मात्र सरकारचा हा आदेश मुंबई हायकोर्टाने फेटाळून लावला आहे. मुंबई हायकोर्टाने ६५ पेक्षा जास्त वय असलेल्या टीव्ही आणि सिनेमातील कलाकारांना स्टु़डियोमध्ये जाण्यासाठी किंवा बाहेर शूट करण्यासाठी मनाई असलेल्या महाराष्ट्र सरकारचा आदेश धुडकावून लावला आहे. 

पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार मुंबई हायकोर्टाने ६५ वर्षावरिल जेष्ठ कलाकारांची शूटींगला न जाण्याची बंदी आता उठवली आहे.

हायकोर्टाने महाराष्ट्र सरकारला विचारलं की जर कोणा ज्येष्ठ नागरिकाला दुकान उघडण्याची परवानगी आहे तर शूटींग करण्यासाठी कोणत्या आधारावर ज्येष्ठ कलाकारांना मनाई केली जाऊ शकते. हायकोर्टाच्या या निर्णयाचं मनोरंजनाविश्वातील कलाकार स्वागत करत आहेत.    

bombay high court order dismissed the maharashtra government prohibiting actor who 65 years of age