Boney Kapoor : 'ओ बोनीजी तुमचं वय काय करता काय! त्या गिगीसोबत चक्क...'

मुंबईमध्ये गेल्या तीन ते चार दिवसांपूर्वी झालेल्या अंबानी कुटूंबियांच्या त्या कार्यक्रमाची मनोरंजन क्षेत्रात चर्चा आहे.
Boney Kapoor Director bad touch slammed Gigi Hadids
Boney Kapoor Director bad touch slammed Gigi Hadidsesakal

Boney Kapoor Director bad touch slammed Gigi Hadids : बॉलीवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता बोनी कपूर हे त्यांच्या वेगळेपणासाठी नेहमीच ओळखले जातात. एखादी मिश्किल टिप्पणी असो, कुणावर थेटपणे केलेलं भाष्य असो वा कुणासोबत काढलेला फोटो असो यात बोनी कपूर चाहत्यांच्या प्रतिक्रियेचे, कौतूकाचे धनी होताना दिसतात. अशातच त्यांच्या एका व्हायरल झालेल्या फोटोनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यावरुन त्यांच्यावर टीकाही होत आहे.

मुंबईमध्ये गेल्या तीन ते चार दिवसांपूर्वी झालेल्या अंबानी कुटूंबियांच्या त्या कार्यक्रमाची मनोरंजन क्षेत्रात चर्चा आहे. नीता अंबानी कल्चरल सेंटरच्या उद्घघाटन सोहळ्याला मनोरंजन क्षेत्रातील मोठमोठे सेलिब्रेटी उपस्थित होते. त्यात रेखाजी यांच्यापासून नोरा फतेही पर्यत सगळ्या सेलिब्रेटींनी त्या कार्यक्रमांमध्ये फोटोसेशनचा मनमुराद आनंद लुटल्याचे दिसून आले. दरम्यान काही मनोरंजक कार्यक्रमांची मेजवानी प्रेक्षकांसाठी ठेवण्यात आली होती. त्यात गिगीनं केलेल्या परफॉर्मन्सनचं प्रेक्षकांनी कौतूक केले.

Also Read - शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता वरुण धवननं त्या गिगीला स्टेजवर सगळ्यांसमोरच किस केले होते. त्यानंतर ती चर्चेत आली. कार्यक्रमानंतर गिगीसोबत बोनी कपूर यांनी फोटोशुट केले. यावेळी त्यांच्याकडून झालेल्या चुकीनं ते ट्रोल होताना दिसत आहे. ते फोटोशुट आणि तो एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामध्ये बोनी कपूर यांचे गिगीसोबतचे वर्तन आक्षेपार्ह असल्याचे नेटकऱ्यांनी म्हटले आहे. त्यांच्यावर टीका होताना दिसत आहे.

नेटकऱ्यांनी वरुण धवन सोबत. बोनी कपूर यांच्यावर आगपाखड केली आहे. इंस्टावर व्हायरल झालेल्या त्या फोटोमध्ये बोनी कपूर यांनी गिगी हदीदला चुकीचा स्पर्श केल्याचे म्हटले गेले आहे.यासगळ्यात काही नेटकऱ्यांनी बोनी कपूर यांना तुमचे वय तुम्ही वागता काय अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com